आंतरराष्ट्रीय 'आर्ट्स मंडी ९' पुरस्काराने चित्रकार प्रभाकर पाचपुते सन्मानित | पुढारी

आंतरराष्ट्रीय 'आर्ट्स मंडी ९' पुरस्काराने चित्रकार प्रभाकर पाचपुते सन्मानित

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर पाचपुते यांना ‘आर्ट्स मंडी ९’ आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे प्रत्येकी १३ हजार ९०० डॉलर असे स्वरूप आहे. 

महाराष्ट्रातून जागतिक पटलावर आपल्या कुंचल्यांची अमिट छाप सोडणारे प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर पाचपुते यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठेचा ‘आर्ट्स मंडी ९’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे भारतासोबत महाराष्ट्राच्या शिरपेचाच मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. ‘आर्ट्स मंडी’ या आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाविष्कारांना सन्मानित करणाऱ्या संस्थेकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार इतर ५ आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकारांसोबत प्रभाकर पाचपुतेंना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पाचपुते यांनी काढलेल्या ‘पोलिटिकल अ‍ॅनिमल’ या चित्रमालिकेतील चित्रांसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

वाचा : इंधन दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल १०४ रुपयांवर, डिझेल ९६ रुपयांवर

प्रभाकर पाचपुते हे महाराष्ट्र राज्य चंद्रपूर जिल्यातील राजुरा तालुक्यातील सास्ती येथील मूळचे रहिवासी आहेत. त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सद्या ते पुण्यात वास्तव्यास आहेत. या पुरस्काने प्रभाकर यांनी जिल्यासोबत राज्याचे परिणामतः देशाचे नाव जागतिक पातळीवर नेले आहे.

हा माझा सन्मान

“परीक्षकांनी मलाही हा पुरस्कार देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे. मी त्याचा मनापासून आदर करतो. सर्व ६ चित्रकारांची पुरस्कारासाठी निवड करण्याचा उत्तम निर्णय परीक्षकांनी घेतला आहे. सध्याच्या कठीण काळामध्ये परीक्षकांनी हा योग्य निर्णय घेतला आहे. अशा उत्तम चित्रकारांसोबत हा पुरस्कार स्वीकारणं हा माझा सन्मानच आहे”, अशी प्रतिक्रिया प्रभाकर पाचपुते यांनी दिली.

वाचा :शरद पवारांच्या दिल्लीतील घरी आज काय होणार?; बैठकीकडे लागल्या सर्वांच्या नजरा 

पुरस्काराची रक्कम १३ हजार ९०० डॉलर

‘आर्ट्स मंडी’ या संस्थेकडून २००२ सालापासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. याचं विद्यमान स्वरूप ४० हजार पौंड अर्थात साधारणपणे ५ हजार ६२० डॉलर इतकं आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच हा पुरस्कार ६ आंतरराष्ट्रीय चित्रकारांना विभागून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक विजेत्या चित्रकाराला १३ हजार ९०० डॉलर इतकी पुरस्काराची रक्कम मिळणार आहे. या पुरस्कारासाठी तब्बल ६० देशांमधून ५०० चित्रकारांनी आपापल्या कला पाठवल्या होत्या. त्यातून या ६ चित्रकारांची निवड करण्यात आली होती.

वाचा :सरनाईकांच्या पत्रावरून शिवसेना संतापली; महाविकास आघाडीच्या आमदारांना ‘विनाकारण त्रास’ का?

प्रभाकर पाचपुतेंच्या कलेला मिळाली पोचपावती

मूळचे पुण्याचे असलेले प्रभाकर पाचपुते यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या चित्रांना जगभर प्रसिद्धी देणाऱ्या कलकत्त्यातील एक्स्परिमेंटर गॅलरीकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. ‘प्रभाकर पाचपुते हे भारतीय उपखंडाचा फार महत्त्वाचा आवाज आहे. हा पुरस्कार त्याच आवाजाला मिळालेली पोचपावती आहे. आपल्याला सामाजिक, राजकीय दृष्ट्या आणि पर्यावरणीय दृष्टी सामना कराव्या लागणाऱ्या समस्या ते त्यांच्या चित्रांमधून मांडत आले आहेत. यातून ते फार गंभीर प्रश्न समाजासमोर उपस्थित करतात’ अशी प्रतिक्रिया एक्स्परिमेंटरकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

Back to top button