किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा | पुढारी

किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

किल्ले रायगड -इलियास ढोकले, दीपक साळुंखे : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे अठ्ठेचाळीसवा शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार आज उत्साहात संपन्न झाला.

यावेळी महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार, सतीश साळुंखे, रोहित पवार राजिप सदस्य मनोज काळीच कर महाड सभापती सौ. सपना मालुसरे, सुभाष मालुसरे, महाड शहर प्रमुख नितीन पावले, महाड शहर युवा सेनाप्रमुख सिद्धेश पाटेकर व इतर अनेक मान्यवर व शिवभक्त यावेळी उपस्थित होते. हिंदू धर्म रीतीप्रमाने विधिवत पूजा यावेळी करण्यात आली.

वाचा : तिसऱ्या आघाडीसाठी तिसरी भेट?; प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात दिल्लीत खलबते सुरुच  

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या मराठी तिथीनुसार गेली अनेक वर्ष  किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमासाठी सर्व संबंधित संस्था शिवभक्त तसेच रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती महाड व विविध शिवभक्त संघटना तसेच शिवभक्तांनी केलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

आमदार  भरतशेठ गोगावले म्हणाले, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होताना आपणासाठी ही पंढरीची वारी आहे. पुढील वर्षी या सोहळ्याला हजारो शिवभक्त उपस्थित राहतील. यासाठी सर्व शिवभक्तांनी मिळुन प्रयत्न करूया,असे आवाहनही त्‍यांनी केले. 

यावेळी राज्याभिषेक दिनोत्सव समितीचे प्रमुख सुनील पवार यांनी मनोगत व्यक्त केले. आजच्या हिंदू तिथी प्रमाणे साजरा होत असलेल्या शिवराज्याभिषेक दिनास महाराष्ट्राचे राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी ५ लाख रुपयांचा निधी शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीकडे सुपूर्त केला आहे, असेही त्‍यांनी सांगितले. 

कोकणकडा मित्रमंडळ महाड, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज रायगड, आणि जिल्हा परिषद रायगड यांच्या संयुक्तरित्या ३४८ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा ५० जणांच्या उपस्थितीत शासनाच्या नियमानुसारच सोहळा साजरा करण्यात आला. मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी कोरोना महामारीमुळे निवडक शिवभक्तांना गडावर प्रवेश देण्यात आला होता. मंगळवारपासूनच पोलिसांनी कडेकाेट बंदोबस्त ठेवला होता.

वाचा : विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला दणका! ९ हजार कोटींची संपत्ती बँकांकडे सुपूर्द

वाचा : धोनीच्या पिळदार मिशांचा नवा लूक पाहिला का? photos

Back to top button