कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' च्या नव्या व्हेरीएंटबाबत सावध आणि सजग राहण्याचा सल्ला! | पुढारी

कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' च्या नव्या व्हेरीएंटबाबत सावध आणि सजग राहण्याचा सल्ला!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : इंडियन सार्स कोवि-2 जीनोम कंसॉर्टीयाच्या अर्थात इन्साकॉगच्या अलीकडच्या अध्ययनाच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांना कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरीयंटबाबत सावध आणि सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. हा नव्या स्वरूपाचा विषाणू या राज्यांच्या काही जिल्ह्यात आढळला आहे.

अधिक वाचा : कणकवलीत सापडला ‘डेल्टा प्लस’चा रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तिन्ही राज्यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत, केरळच्या पलक्कड आणि पाठ्नामथित्ता जिल्ह्यांत तसेच मध्य प्रदेशातील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यात हा व्हेरीयंट आढळला आहे. संक्रमण क्षमतेत वाढ, फुप्फुसांच्या पेशींशी संयुग होण्याची अधिक क्षमता, मोनोक्लोनल अँटिबॉडी प्रतिसाद कमी होण्याची शक्यता अशी या विषाणूंची वैशिष्ट्ये आहेत.

अधिक वाचा : डेल्टा व्हेरियंटवर सर्व लसी निष्प्रभ

या व्हेरिएंटचा सामना करताना सार्वजनिक आरोग्य विषयक उपाययोजना अधिक प्रभावीपणे कराव्यात,असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना सल्ला दिला आहे. इन्साकॉगच्या उपाययोजना तातडीने अमलात आणल्या जाव्यात असे निर्देश, राज्यांच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.

अधिक वाचा : 60 टक्के वेगाने पसरतो ‘डेल्टा प्लस’ विषाणू; महाराष्ट्रासह इतर राज्यांतही सापडले रुग्ण

गर्दी आणि सार्वजनिक ठिकाणी संचारावर निर्बंध, चाचण्यांची संख्या वाढवणे, संशयित रुग्णांचा माग अशा उपायांचा समावेश आहे. तसेच या भागात लसीकरणाला वेग देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या स्वॅबचे नमुने ताबडतोब इन्साकॉगच्या प्रयोगशाळांमध्ये पाठवले जावे जेणेकरुन त्यांचे परीक्षण लगेच केले जाऊन, राज्यांना त्याविषयी माहिती दिली जाऊ शकेल, अशीही सूचना राज्यांना देण्यात आली आहे.

अधिक वाचा : गोवा राज्यात डेल्टा व्हेरियंट स्ट्रेनच्या २६ रुग्णांची नोंद

 

Back to top button