'महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसी आरक्षणाचा खून; मराठ्यांना १० वर्ष आरक्षण मिळणं अवघड' | पुढारी

'महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसी आरक्षणाचा खून; मराठ्यांना १० वर्ष आरक्षण मिळणं अवघड'

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ओबीसी आरक्षणावरून अत्यंत आक्रमक झालेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा खून केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.  फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ओबीसी आरक्षणप्रश्नी आम्ही शांत बसणार असा इशाराही त्यांनी दिला. 

अधिक वाचा : ‘ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?’ रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर निशाणा

फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. ते म्हणाले की, राज्यात सरकार म्हणून अस्तित्व आहे का? मंत्री आपल्या विभागाचे राजे झाले आहेत आणि प्रत्येक विभागात एक एक वाझे आहे. ही अवस्था महाराष्ट्राची झाली आहे. राज्याच्या इतिहासात अत्याचाराने बरबटलेलं हे सरकार आहे. अशी अवस्था गेल्या ६० वर्षात पाहिली नाही.

अधिक वाचा : ‘महाविकास आघाडीकडून शेतकरी, कष्‍टकरी वर्गाचा भ्रमनिरास’

या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. घेतलेला निर्णय तासाभरात रद्द होतो, मग दुसऱ्या दिवशी तोच पुन्हा निर्णय घेतला जातो. हे सरकार आहे की सर्कस? अशी बोचरी टीका त्यांनी केली. 

Back to top button