पंधरा महिने झाले हे सरकार फक्त न्यायालयाकडून तारखाच घेत आहे : पंकजा मुंडेंचा घणाघात | पुढारी

पंधरा महिने झाले हे सरकार फक्त न्यायालयाकडून तारखाच घेत आहे : पंकजा मुंडेंचा घणाघात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. सरकारने 15 महिने गोल-गोल फिरवलं, कुठलाही डाटा न्यायालयात जमा केला नाही, अशी टीका भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर केली. 

अधिक वाचा : ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक, राज्यभरात सरकारविरोधात तीव्र आंदोलने

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने राज्यभर आंदोलन पुकारले असून, पुण्यात भाजप नेत्यांनी कात्रज चौकात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

एवढं छोटा मन ठेवून तुम्ही मोठं होऊ शकत नाही. या सरकारचा मला सांगायचे आहे, चुकून तुम्ही राज्यात सत्तेवर आलात भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उेभे करणार नाही. मी ओबीसींना सांगू इच्छिते तुम्ही, आपले मन तुटू देऊ नका, संघर्षाची भावना तुटू देऊ नका, ओबीसींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. भविष्यातल्या संघर्षासाठी आम्ही तयार आहोत, असे त्या म्हणाल्या. 

अधिक वाचा : आम्हीही गप्प बसणार नाही, बघून घेऊ; शिवसेनेचा भाजपला इशारा 

मी मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, ओबीसीचे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरती गेले याच्याविषयी न्यायालयातत तारखा सुरु होत्या ते आरक्षण कसे योग्य आहे, हे सांगण्यासाठी आम्ही न्यायालयात डाटा सबमिट करत होतो, तेवढ्यात आचारसंहिता लागली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि जवळपास पंधरा महिने झाले हे सरकार फक्त न्यायालयाकडून तारखाच घेत आहे. इंपिरिकलच्या आधारे कृष्णमूर्ती यांच्या मतांच्या आधारावर सरकारने हा सगळा डाटा सबमिट करावा असे त्यांनी सांगितले पण या सरकारने कुठलाही डाटा तयार केला नाही. सरकार फक्त गोल गोल फिरवत आहे, असे म्हणत सरकारवर टीका पंकजा मुंडे यांनी केली.

अधिक वाचा : सावकारी पैशाच्या वादातून युवकास जिवंत जाळले

मंत्र्यांना आंदोलन शोभते का ?

भाजपाच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर सरकारमधील एका पक्षाने आंदोलनाची घोषणा दिली. मंत्री आज आंदोलनाची भाषा करत आहेत. शोभते का तुम्हाला? आम्ही मंत्री असताना आंदोलन केली का हो? आम्ही आरक्षण दिले, आरक्षणाला संरक्षण दिले, मंत्र्यांनी आंदोलन नाही तर निर्णय करायचे असता. आंदोलन करायला विरोधी पक्ष आहे, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टिकास्त्र सोडले.

Back to top button