संजय राऊत बिनबुडाचा लोटा, खातात शिवसेनेचे आणि जागतात शरद पवारांसाठी : गोपीचंद पडळकर | पुढारी

संजय राऊत बिनबुडाचा लोटा, खातात शिवसेनेचे आणि जागतात शरद पवारांसाठी : गोपीचंद पडळकर

विटा; पुढारी वृत्तसेवा : संजय राऊत खातात सेनेचे आणि जागतात शरद पवारांना. अशा भाटाची धनगर समाजाला आवश्यकता नाही अशा अत्यंत खालच्या भाषेत भाजप प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

अधिक वाचा : ‘अनिल देशमुखांनी चार कोटी ट्रस्टकडे वळवले’

आज मुंबईत संजय राऊत यांना “आमच्या हातात सत्ता द्या चार महिन्यात आरक्षण देतो असे फडणवीस यांनी विधान केले आहे ” यावर प्रतिक्रिया विचारली असता खासदार राऊत म्हणाले की, 2014 मध्ये तुम्हाला लोकांनी सत्ता दिली होती. त्यावेळी धनगर समाजाला फडणवीस यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आरक्षण देतो असे सांगितले होते. मात्र पाच वर्षे झाली तरी त्यांना आरक्षण देता आले नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

अधिक वाचा : ओबीसींचा प्रश्न कसा सोडवणार ते सांगा, त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही : जयंत पाटील 

तसेच कोणत्याही समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय असू नये सत्ता असो वा नसो सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी मांडली. मात्र या भूमिकेबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत असबंध टीका केली.

अधिक वाचा : घरगुती गॅसच्या किंमती ६० टक्‍क्यांपर्यंत वाढणार

आमदार पडळकर म्हणाले की, ओबीसी समाजासाठी फडणवीस सरकारने 23 जीआर काढले ते संजय राऊतांना माहिती नाही. २३ जीआरची अंमलबजावणी या सरकारने केलेली नाही. त्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. भावा भावांच्या भांडणांमध्ये दस्तलेखक म्हणून भावाचा राजीनामा घेतला आणि आत्ता काकाच्या सांगण्यावरून आज अग्रलेखामध्ये अविनाश भोसले हे अजित पवारांच्या किती जवळ आहेत असे सांगून अजित पवारांच्या बुडाखाली फटाके लावण्याचे काम हे करत आहेत. असा हुजरे ना कधी जन्माला आला ना कधी जन्माला येईल असेही पडळकर यांनी म्हटले आहे.

Back to top button