मुस्लीम आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकर रझा अकादमीला सोबत घेऊन मोर्चा काढणार | पुढारी

मुस्लीम आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकर रझा अकादमीला सोबत घेऊन मोर्चा काढणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुस्लीम आरक्षणासाठी येत्या ५ जुलैला रझा अकादमीच्या साथीत सरकारविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय आला  असला, तरी मुस्लीम आरक्षणाबाबत निर्णय झाला नसल्याचे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही तोफ डागली. 

दोन्ही पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजत असताानाही मुस्लिमांना आरक्षण मिळाले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. सरकारविरोधात जुलैला विधानभवनावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चामध्ये वंचितसह रझा अकादमी असणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.  न्यायालयाने मुस्लीमांसाठी ५ टक्के आरक्षण मान्य केलं आहे.  सरकारने याबाबतीत भूमिका घेऊन आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

Back to top button