कराडात प्रशासनाने व्यापार्‍यांचे आंदोलन हाणून पाडले | पुढारी

कराडात प्रशासनाने व्यापार्‍यांचे आंदोलन हाणून पाडले

कराड; पुढारी वृत्तसेवा : कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आला. यावेळच्या लॉकडाऊनला सामान्यांसह व्यापारी आणि इतर वर्गांनेदेखील तीव्र विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन व्यापार्‍यांनी तहसिलदार यांना सोमवारी देण्यात आले. 

वाचा : खा. रणजितसिंह निंबाळकरांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान?

बुधवारी शहरातील व्यापार्‍यांनी एकत्रित येत येथील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार व्यापारी दत्त चौकामध्ये एकत्र जमा झाले. मात्र पोलिस प्रशासनाने व्यापार्‍यांचे हे आंदोलन हाणून पाडत सर्व व्यापार्‍यांना परत घालवले. व्यापार्‍यांना छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाण्यास विरोध केला आणि व्यापार्‍यांनी दुकाने उघडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. 

यावेळी वरिष्ठ पो. नि. बी. आर. पाटील, डीवायएसपी रणजित पाटील यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. एकत्र येण्यासाठी पोलिस प्रशासनाची परवानगी घेतली नाही, त्यामुळे बेकायदेशीर एकत्रित येणार्‍या काही नागरिकांना ताब्यात घेतल्याचे बी. आर. पाटील यांनी सांगितले.

वाचा : सातारा : विलासबाबांना पोलिसांनी केले स्थानबद्ध

दरम्यान, नगर पालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने मंडईतील काही दुकाने सील करण्यात आली. सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Back to top button