गोकुळच्या नव्या कारभाऱ्यांनी शब्द पाळला! दुध उत्पादकांना दरवाढ (video) | पुढारी

गोकुळच्या नव्या कारभाऱ्यांनी शब्द पाळला! दुध उत्पादकांना दरवाढ (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोकुळच्या दूध उत्पादकांना दरवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हशीच्या दूधाला २ रुपये व गायीच्या दूधाला १ रुपये दरवाढ देण्यात आली आहे. ही दरवाढ ११ जुलै पासून लागू होणार आहे. अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अधिक वाचा : गोकुळचा वचपा जिल्हा परिषदेत काढणार?

या दरवाढीचा फरक २१, २२, तारखेला बिलामध्ये देण्यात येणार आहे. अमुलने विक्रीमध्ये दरवाढ केली आहे. गोकुळही विक्रीमध्ये दरवाढ करणार आहे. गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादकांना कसा फायदा होईल याकडे आमच लक्ष असणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.   

अधिक वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात ‘या’ घटनांत सुनावली होती फाशीची शिक्षा

एकीकडे दुध उत्पादकांना दरवाढ देण्यात आली, असली कोल्हापूर जिल्हा वगळून विक्री दरातही वाढ करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा वगळून इतर ठिकाणी दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. भूमिहीन शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून २ म्हशी घेण्यापर्यंत विनातारण कर्ज देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. २० लाख लिटर दुध संकलनाचा संकल्प केला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Back to top button