भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बैलगाडीतून कोसळले; आंदोलनातच घडला प्रकार! | पुढारी

भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बैलगाडीतून कोसळले; आंदोलनातच घडला प्रकार!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुबंईमधील अँटोप हिल येथील भरणी नाका परिसरात महागाई विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन सुरु असताना बैल गाडीवर मुबंई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्यकर्ते उभे राहून घोषणा देते होते. यावेळी बैलगाडीवर क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते जमा झाल्याने बैलगाडी कोसळली. या घटनेत काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले.

अधिक वाचा : ‘एवढा पैसा कमवून तुला ब्लाऊज घालता येत नाही का?’ (video)

इंधन दरवाढी विरोधात आज काँग्रेसतर्फे अंटोप हिलमध्ये काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा होता. मात्र या मोर्चाचा फज्जा उडाला. कारण ज्या बैलगाडीवर निदर्शने करण्यात येत होती, ती बैलगाडीच उलटली आणि दुर्घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते या बैलगाडीवर चढले. स्वतः भाई जगताप या बैलगाडीवर होते. सुदैवाने कोणला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र बैलगाडीचे नुकसान झाले असून बैलाना जखमा झाल्या आहेत.

अधिक वाचा : राज्यातील ‘या’ ५ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

 

Back to top button