गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार! काँग्रेस नेते बैलगाडीतून कोसळल्याने भाजपची बोचरी टीका | पुढारी

गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार! काँग्रेस नेते बैलगाडीतून कोसळल्याने भाजपची बोचरी टीका

मुंबई; पुढारी ऑनलाईन : इंधन दरवाढी विरोधात मुबंईमधील अँटोप हिल येथील भरणी नाका परिसरात महागाई विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन सुरु असताना बैलगाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते आणि नेते जमल्याने बैलगाडी कोसळली. यामध्ये गंभीर दुखापत कोणाला झाली नाही, पण अनेकांना किरकोळ जखमा झाल्या. 

अधिक वाचा : भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बैलगाडीतून कोसळले; आंदोलनातच घडला प्रकार!

दरम्यान, या प्रकारानंतर भाजपने आयती संधी साधत काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ट्विट करून म्हटले आहे की, गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा’ नकार! भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, “माणसाने झेपेल तेवढंचं करावं!” असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा! या ट्विटमध्ये त्यांनी भाई जगताप यांना टॅग केलं आहे. 

अधिक वाचा : ‘एवढा पैसा कमवून तुला ब्लाऊज घालता येत नाही का?’ (video)

दरम्यान, बैलगाडी कोसळली त्यावेळी मुबंई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्यकर्ते उभे राहून घोषणा देते होते. यावेळी बैलगाडीवर क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते जमा झाल्याने बैलगाडी कोसळली. या घटनेत काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले.

अधिक वाचा : राज्यातील ‘या’ ५ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

इंधन दरवाढी विरोधात आज काँग्रेसतर्फे अंटोप हिलमध्ये काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा होता. मात्र या मोर्चाचा फज्जा उडाला. कारण ज्या बैलगाडीवर निदर्शने करण्यात येत होती, ती बैलगाडीच उलटली आणि दुर्घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते या बैलगाडीवर चढले. स्वतः भाई जगताप या बैलगाडीवर होते. सुदैवाने कोणला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र बैलगाडीचे नुकसान झाले असून बैलाना जखमा झाल्या आहेत.

Back to top button