पुन्हा पावसातले 'ते' क्षण! श्रद्धा कपूर-आदित्य रॉय कपूर पुन्हा एकत्र (Video)

पुन्हा पावसात क्युट मोमेंट! Shraddha-Aditya Roy Kapur रिमझिम पावसात पुन्हा एकत्र
Shraddha Kapoor-Aditya Roy Kapur
श्रद्धा कपूर-आदित्य रॉय कपूर पुन्हा एकत्र दिसले Instagram
Published on
Updated on

कला जगतात कधी काय घडेल, याची काही शाश्वती देता येत नाही. सेलिब्रिटींची नाती कधी जुळतात आणि कधी तुटतात. चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अनेकांची नाती जुळतात मग ते नात्यात राहतात. असे काहीसे घडले आहे ते अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत. २०१३ मध्ये 'आशिकी २' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील आदित्य रॉय कपूर म्हणजे राहुल जयकर आणि आरोहीची (श्रद्धा) जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. 'आशिकी २' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघे पडद्यावरील आवडती जोडी ठरली. त्यानंतर आदित्य आणि श्रद्धा खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करू लागल्याच्या चर्चा रंगल्या; पण त्यांचे नाते काही फार काळ टिकले नाही.

एका कार्यक्रमात श्रद्धा पोहोचली होती. त्याच कार्यक्रमात आदित्यही उपस्थित होता. यावेळी श्रद्धा पावसात उभी होती. श्रद्धाच्या मदतनीसने तिच्यासाठी छत्री पकडली होती. याचवेळी तिच्या बाजूला आदित्य आला आणि त्याने श्रद्धाला हाक मारली. त्यानंतर दोघेजण काही काळ एकमेकांशी हसत बोलले आणि त्यानंतर श्रद्धा पुढे निघून गेली. यावेळी दोघांमधील केमिस्ट्री पाहून नेटकऱ्यांना पुन्हा 'आशिकी २' मधील रोमॅटिक सीनची आठवण झाली. पाऊस, साडी आणि छत्री... असा योगायोग पुन्हा एकदा या दोघांमध्ये जुळून आला होता.

video-viral bhayani insta वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news