इच्छामरण मागणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीची आत्महत्या 

Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कन्नड चित्रपटाची प्रसिध्द अभिनेत्री आणि बिग बॉस कन्नडची माजी कंटेस्टेंट जयश्री रमैया (Jayashree Ramaiah) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बंगळूर येथील तिच्या राहत्या घरी तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. जयश्री मागील काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती. तिने आत्महत्या केली की नाही, याबाबतची पुष्टी अद्याप झालेली नाही. याप्रकरणी पोलिस तपास करत आहे. 

डिप्रेशनवर सुरू होते उपचार…

जयश्री रमैयावर बंगळूरातील संध्या किरण आश्रममध्ये उपचार सुरू होते. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी जयश्रीच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी फोन केला. परंतु, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आश्रममध्ये संपर्क केला. जेव्हा आश्रम ऑथॉरिटीने पाहिलं तेव्हा जयश्रीचा मृतदेह पंख्याला लटकलेला मिळाला होता. 

मागितले होते इच्छामरण 

मागील वर्षी जयश्री रमैयाने एका पोस्टच्या माध्यमातून हे जग सोडण्याविषयी म्हटले होते. तिने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपण तणावात असल्याचे म्हटले होते. सोशल मीडियावर लाईव्ह सेशनदरम्यान, तिने धक्कादायक गोष्ट सांगितली होती. ती म्हणाली होती की, जयश्रीने म्हटले होते की, आता ती डिप्रेशनला सामोरे जाऊ शकत नाही. तिला इच्छा-मरण हवे आहे. 

जयश्रीने लाईव्ह सेशनमध्ये म्हटलं होतं की, मी आर्थिकपणे मजबूत आहे, पण डिप्रेशनमध्ये आहे. मी खूप साऱ्या खासगी मुद्द्यातून गेले आहे. मला लहानपणापासूनच धोका देण्यात आला आहे आणि हे दूर करण्यास मी असमर्थ आहे. 

मी हारलेली महिला 

यानंतर जयश्रीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते, 'मी हारलेली महिला आहे. जिला इच्छा-मृत्यूची आवश्यकता आहे. मी एक चांगली मुलगी नाही. प्लीज, प्लीज, प्लीज मला इच्छामरण द्या.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news