

टेलिव्हिजनचा सगळ्यात लोकप्रिय शो बिग बॉस 19 सध्या फुल फॉर्ममध्ये आहे. या शोमधील उत्कंठा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा शो सुरू होऊन आता नऊ आठवडे झाले आहेत. आता या शोच्या वीकएंडला रोज एक नवीन ड्रामा सुरू असतो. आता या शोबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. या शोच्या फिनालेबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. यामुळे आता फॅन्सची उत्सुकता अजूनच वाढली आहे. (Latest Entertainment News)
रिपोर्टसनुसार बिग बॉस 19चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर 2025 ला होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अर्थात या तारखेबाबत मेकर्सकडून अजूनही कोणतीही ऑफीशियल घोषणा केली गेली नाहीये. पण सोशल मिडियावर मात्र या तारखेची जोरदार चर्चा आहे.
याशिवाय हा शो अजून दोन आठवडे वाढवला जाऊ शकतो अशीही शक्यता बोलून दाखवली जात आहे. सध्या तरी हा शो अजून 40 दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. अशातच प्रश्नचिन्ह उभे राहते की मेकर्स केवळ टास्कच्या माध्यमातून मनोरंजन करणार का? तर यावर असे बोलले जात आहे की, या शोमध्ये आणखी एक वाइल्ड कार्ड एंट्री होऊ शकते. अशी चर्चा आहे की अभिषेक बजाजच्या माजी पत्नीची या शोमध्ये एंट्री होऊ शकते. बिग बॉसच्या 19 व्या सीझनची सुरुवात 24 ऑगस्ट 2025 ला झाली.
यावेळी घरात काहीसे वेगळे घडले आहे. यावेळी बिग बॉसने शिक्षा म्हणून अभिषेक, अशनूर आणि कप्तान सोडून सगळ्या घराला नॉमिनेट केले आहे. तसेच बिग बॉसने घरातल्या सदस्यांच्या वाणसमानात 60 % कपातही केली आहे.
यावेळी बिग बॉसच्या घरात डबल एविक्शन होणार असे बोलले जात आहे. घरातून बाहेर जाणारा सदस्यांमध्ये नेहल चुडासामा आणि बसीर अली हे सदस्य घराबाहेर होणार आहेत.