आम्ही शूटिंग करत होतो अन्‌ मायकल जॅक्सन आला..अनुराग बसूने सांगितला 'तो' किस्सा

India's Best Dancer | अनुराग बसूने मायकल जॅक्सनची ती आठवण सांगितली
India's Best Dancer show
instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर-सीझन ४ तुमच्या वीकएंडला मस्त फिल्मी तडका देणार आहे. या वीकएंडचे एपिसोड्स प्रेक्षकांना आठवणींच्या दुनियेत घेऊन जातील. कारण यावेळी थीम आहे- ‘ईराज ऑफ बॉलीवुड’. वेगवेगळ्या दशकात बॉलीवूडची स्टाईल कशी बदलत गेली, हे आपल्या परफॉर्मन्समधून दाखवून स्पर्धक हिंदी सिनेमाला आदरांजली वाहतील. करिश्मा कपूर, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस सोबत या वीकएंडला दिग्दर्शक अनुराग बसू असणार आहे. थेट कृष्ण-धवल युगापासून ते नव्वदच्या दशकातील बॉलीवूडचा प्रवास डान्समधून स्पर्धक सादर करणार आहेत.

India's Best Dancer show
instagram

उत्तराखंडहून आलेला नेपो आणि त्याची कोरिओग्राफर वर्तिका झा मिळून तडफदार परफॉर्मन्स देतील. हे दोघे मिळून ‘काइट्स’ चित्रपटातील ‘दिल क्युं ये मेरा’ गाण्यावर परफॉर्म करताना दिसतील. भारतीय सिनेमाच्या या जबरदस्त दशकाची झलक त्यांच्या डान्समधून बघायला मिळेल.

ज्याने काईट्स चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तो अनुराग बसू हा अॅक्ट पाहून चकितच झाला. तो म्हणाला, “सुंदर! मी थोडे मागे जाऊन या गाण्याचे शूटिंग पुन्हा करू का? (हसतो). खूपच छान, सुंदर, डौलदार आणि अद्भुत! वर्तिका आणि नेपो तुम्ही दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहात आणि तुम्ही कमाल केलीत. वर्तिकाची बरोबरी करणे फार कठीण आहे, पण नेपो, तू खूप डौलदार डान्सर आहेस, हळुवार आणि खूप सुंदर!”

India's Best Dancer show
instagram

अनुराग बसूने सांगितली 'ती' आठवण

नंतर जेव्हा गीता कपूरने अनुराग बसूला या गाण्याच्या चित्रीकरणामागची विचार प्रक्रिया विचारली, तेव्हा तो म्हणाला, “आम्ही LA मधल्या एका भव्य हवेलीत या गाण्याचे चित्रीकरण करत होतो. तिथल्या एका खूप मोठ्या बेडरूमचा आम्ही मेकअप रूम म्हणून उपयोग करत होतो. अचानक कुणी तरी येऊन सांगितले की, आम्हाला ती खोली तातडीने रिकामी करावी लागेल, कारण मायकल जॅक्सन ती प्रॉपर्टी बघायला येणार होता, कारण त्याला ती भाड्याने घ्यायची होती. सुरुवातीला आम्ही हे फारसे गंभीरपणे घेतले नाही. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की, तो येणार नाहीये; कुणी तरी दुसरा माणूस, एक रियल इस्टेट एजंट येणार आहे. त्यामुळे आम्ही शूटिंग चालू ठेवले. पण नंतर मायकल जॅक्सन खरोखरच आला. आम्ही शूटिंग करत होतो आणि त्याची कार आली. त्यावेळी तुम्ही डुग्गूला बघायला हवं होतं- तो मायकल जॅक्सनचा खूप मोठा चाहता आहे. तो तर वेडाच झाला! त्याला मायकल जॅक्सनसोबत फोटो काढायचा होता. ही खरोखरच आश्चर्याची बाब होती की, आम्ही शूटिंग करत असतानाच नेमका तिकडे मायकल जॅक्सन आला. डुग्गू आणि मी तर स्तब्धच झालो, आम्हाला शब्दच सुचेनात. या चित्रपटाशी संबंधित अशा काही खूप गोड आठवणी आहेत.”

अनुराग बसूला आली केकेची आठवण

तो अॅक्ट बघताना अनुराग बसूला पार्श्वगायक स्व. केकेची आठवण आली. तो म्हणाला, “हा अॅक्ट जेव्हा सुरू झाला, तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला, तो केकेचा. मला त्याची फार आठवण येते. माझी काही चांगली गाणी त्याने म्हटली आहेत- मग ती ‘गँगस्टर: अ लव्ह स्टोरी’ चित्रपटाची असो किंवा ‘लाईफ इन अ मेट्रो’ची असो. केकेने मला अशी काही अद्भुत गाणी दिली आहेत. हे गाणे त्यापैकीच एक आहे. दुर्दैवाने तो आता आपल्यात नाही.”

या वीकएंडला ‘ईराज ऑफ बॉलीवुड’ इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन ४ मध्ये, रात्री ८ वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहता येईल.

India's Best Dancer show
New Movie | विनीत कुमार सिंहचे बर्थडे गिफ्ट, सनी देओल-स्टार 'SDGM' चित्रपटात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news