अनन्या पांडे हे सातत्याने चर्चेत असलेले नाव आहे. अनन्याच्या कामापेक्षा अफेअर्सची चर्चा सुरू असते. अनन्या ही गेल्या काही वर्षांपासून आदित्य रॉय कपूर याला डेट करत होती; पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. अनन्या सोबतच्या ब्रेकअपनंतर आदित्य हा डेटिंग अॅपवरही दिसला आहे. अनन्याचे नाव थेट क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत जोडले गेले. अनन्या आणि हार्दिकचे डान्स करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. आता दुसऱ्याच एका क्रिकेटरसोबत अनन्याचे नाव जोडले जात आहे. अनन्या आणि शुभमन गिल यांनी काही दिवसांपूर्वीच एक जाहिरात एकत्र केली आहे. एका मुलाखतीत चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अनन्याने मोठा खुलासा केला.
अनन्या म्हणते की, क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट ही एका जाहिरातीच्या चित्रीकरणावेळी झाली आणि त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. विराट आणि अनुष्काप्रमाणेच तुझे आणि शुभमनचे होऊ शकते का रिलेशन ? यावर अनन्या म्हणाली की, मुळात आम्ही खूप वेगळे आहोत. मी आणि शुभमन कधीच रिलेशनमध्ये येऊ शकत नाही. आम्ही केवळ त्या जाहिरातीसाठीच भेटलो होतो. त्यानंतर आमच्यात काही बोलणे झाले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने शुभमनचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले जात आहे; पण तो कोणाला डेट करत आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.