Aho Vikramaarka Movie | देव गिल धडाकेबाज अंदाजात

चाहत्यांनी ७५ फूटी पोस्टर बनवून दिल्या ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाला शुभेच्छा
Aho Vikramaarka Movie
देव गिल पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - गेल्या अनेक दिवसांपासून देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाच्या चर्चा सुरु आहेत. दाक्षिणात्य सुपस्टार देव गिल ‘अहो विक्रमार्का’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर त्याच्या चाहत्यांनी देव गिल याचे ७५ फूटी भव्य पोस्टर बनवले आहेत. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

माझ्या आजवरच्या सर्व कलाकृतीला व भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. चाहत्यांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या आजवरच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘अहो विक्रमार्का’ ला सुद्धा हा प्रतिसाद मिळेल. हा चित्रपट प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करेल.

अभिनेता देव गिल

या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अॅक्शन, इमोशन्स आणि ड्रामा असा सगळा मसाला असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचं ‘फुल्ल ऑन’ मनोरंजन करणार आहे. परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या एका धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याची कहाणी दाखवणाऱ्या ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात देव गिल पोलिस अधिकाऱ्याच्या जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘हा चित्रपट मी माझ्या आईसाठी बनवला असल्याचे सांगताना हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल असा विश्वास त्याने ट्रेलर लाँच प्रसंगी व्यक्त केला.

'अहो विक्रमार्का’मध्ये 'हे' असतील कलाकार

मूळचा पुण्याच्या असलेल्या देवला मराठी भाषा तिथली संस्कृती याचा नितांत आदर आहे. मराठीसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने ‘अहो विक्रमार्का’ या भव्य चित्रपटाच्या निर्मितीची धुरा त्यांनी सांभाळली. सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, तेजस्विनी पंडित, अनिल नगरकर अशा अनेक मराठी कलाकारांची साथ या चित्रपटासाठी देवला लाभली.

यादिवशी प्रदर्शित होणार 'अहो विक्रमार्का’

'अहो विक्रमार्का’ चित्रपटसृष्टीतील पहिला मराठी ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट ५ भाषांमध्ये ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अभूतपूर्व साहस, जाज्वल्य देशाभिमान दाखवत पोलिसांच्या शौर्याला, खाकी वर्दीतल्या हिरोंना सलाम करणारा ‘अहो विक्रमार्का' हा चित्रपट आहे.

Aho Vikramaarka Movie
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news