पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता गोविंदा आणि शिवसेना नेते गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्यानंतर आता रुग्णालयातून पहिल्या प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले असून सर्वांनी प्रार्थना केल्याबद्ल धन्यवाद दिले आहेत. एका वृत्तसंस्थेने अभिनेता गोविंदा यांची प्रतिक्रिया एक्स अकाऊंटवर दिली आहे.
गोविंदा यांच्या पायावर आज सकाळी चुकून रिव्हॉल्वरची गोळी लागली होती. ही रिव्हॉल्वर स्वत: त्यांची होती. मंगळवारी सकाळी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार करण्यात आले.
"तुम्हा सर्वांच्या आणि माझ्या पालकांच्या आशीर्वादाने गोळी काढण्यात आली आहे. माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना केल्याबद्दल डॉक्टरांचे आणि तुमचे आभार मानतो."