साउथ सुपरस्टार सिद्धार्थ युट्यूबवर मृत घोषीत अन्...

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : साउथ सुपरस्टार सिद्धार्थ बाबत धक्कादायक वृत्त व्हायरल होत आहे. युट्यूबवर सिद्धार्थ याचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग संभ्रमात पडला. मात्र सिद्धार्थने ट्विट करत दिलासा दिला आहे.

दरम्यान, सिद्धार्थ याने ट्विट करत त्याच्या मृत्यूच्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.

अभिनेता सिद्धार्थला मृत घोषित केले

यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये कमी वयात जगाचा निरोप घेतलेल्या दहा साउथ इंडियन सेलिब्रिटींची नावं दाखवण्यात आली. या यादीमध्ये तमिळ अभिनेता सिद्धार्थचं सुद्धा नाव देण्यात आलं.

अधिक वाचा

एका फॅनने या व्हिडिओचा एक स्क्रीनशॉट काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. या स्क्रीनशॉटमध्ये अभिनेत्री सौंदर्या, आरती अग्रवाल आणि सिद्धार्थ दिसून येत आहे.

सिद्धार्थने जाब विचारताच युट्यूबने दिले विचित्र उत्तर

अभिनेत्री सौंदर्याचं २००४ साली निधन झालं. आरती अग्रवाल हिने २०१५ मध्ये जग सोडलं. पण सिद्धार्थ अजूनही जिवंत आहे. जेव्हा सिद्धार्थला या व्हिडिओंबद्दल कळाले तर त्याने यूट्यूबवर याबाबत जबाब विचारला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आम्हाला काहीच गैर दिसत नाही, असे उत्तर यूट्यूबने दिले आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असतो सिद्धार्थ

अभिनेता सिद्धार्थ सोशल मीडियावरही सक्रिय असतो. तो प्रत्येक मुद्द्यावर आपलं स्पष्ट मत नेहमीच नोंदवत असतो. त्याने यापूर्वी कोरोना काळात अनेक समस्यांविरोधात आपला आवाज उठवला होता. इतकेच नव्हे तर त्याने अनेकदा सरकारवर सुद्धा निशाणा साधला आहे.

अधिक वाचा

वर्कफ्रंटबद्दल

सिद्धार्थ ‘अरुवम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याचा हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झाला होता. सिद्धार्थने नुकतंच ‘महा समुद्रम’ या चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे.

याशिवाय तो ‘इंडियन 2’, ‘टक्कर’, ‘नवरस’ आणि ‘शैतान का बच्चा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे वाचलंत का?

Back to top button