Pathan movie : ‘पठाण’चे स्पेनमधील शूटिंग लांबणीवर - पुढारी

Pathan movie : ‘पठाण’चे स्पेनमधील शूटिंग लांबणीवर

पुढारी ऑनलाईन

शाहरूख खानचा पुनरागमनाचा चित्रपट म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात आहे, त्या बहुचर्चित पठाण (Pathan movie) चित्रपटाचे स्पेनमधील शूटिंग शेड्युल आता पुढे ढकलले गेले आहे. युरोपमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने हे शूटिंग पुढे ढकलावे लागले आहे. आता ते फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. स्पेनमध्ये 20-25 दिवसांचे शूटिंग होणार आहे. गाण्यांसह इतरही शूटिंग तेथे होणार आहे. (Pathan movie)

आतापर्यंत तिसर्‍यांदा स्पेनमधील शूटिंग पुढे ढकलावे लागले. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर शाहरूखने पुन्हा शूटिंगला सुरुवात केली होती, पण तेवढ्यात या शूटिंगला ब्रेक लागला आहे. तसेच दीपिका पदुकोनही न्यू इयरच्या व्हेकेशननंतर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये जॉईन होणार होती.

Back to top button