पुढारा ऑनलाईन : अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi corona ) हिला कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती नोराने एक पोस्ट करून स्वत: सोशल मीडियावर दिली आहे.
नोराने नुकतीच इंस्टाग्राम अंकाऊटवर एक पोस्ट शेअर करून कोरोना झाल्याची माहिती देत( Nora Fatehi corona ) लिहिले आहे की, 'मित्रांनो, दुर्दैवाने मी सध्या कोरोनाशी लढत आहे. हे माझ्या स्वतःच्या चुकीमुळे घडले आहे. आता काही दिवस मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार आहे. कृपया सुरक्षित रहा, सर्वांनी काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा. मास्कचा वापर करा. कोरोना वेगाने पसरत आहे. आरोग्यापेक्षा महत्वाचे काहीच नाही. काळजी घ्या, असे तिने लिहिले आहे. यावरूनम तिने आपल्या चाहत्यांना देखील कोरोना संसर्गापासून बचावण्यासाठी काळजीसोबत मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.
याशिवाय नोराच्या जवळच्या व्यक्तीने नोराच्या २८ डिसेंबर रोजी कोरोनाची टेस्ट केली होती. यानंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याशिवाय नोरा सर्व प्रोटोकॉल्सचे पालन करत असून डॉक्टरांनी देखरेखाली असून आयसोलेट केले असल्याचे त्याने सांगितले आहे.
नोराच्याआधी काही दिवसांपूर्वीच टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन बिजलानी आणि बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर यांना कोरोनाची लागण झाली होती.
नोराचा 'डान्स मेरी राणी' नवा म्युझिक अल्बम नुकताच रिलीज झाला आहे. या व्हिडिओच्या प्रमोशनसाठी नोरा गायक गुरु रंधावासोबत गेली असताना तिच्या कार ड्रायव्हरचा अपघात झाला होता. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नव्हती.
नोराने 'झलक दिखला जा', 'बिग बॉस ९' , 'कॉमेडी नाइट्स बचाओ','डान्स प्लस ४' या शोमध्ये दिसली होती. तिच्या 'दिलबर दिलबर' , 'हाय गरमी' या गाण्याला चाहत्यांची विशेष पसंती मिळाली. 'रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
हेही वाचलंत का?