पुढारी ऑनलाईन डेस्क
अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अभिनेत्रींनीअनेक पार्ट्यांना हजेरा लावली होती. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. कोरोना नियमांचा भंग करत त्यांनी पार्ट्यां केल्या आहेत.दरम्यान, सेलेब्रिटींच्या पार्ट्या ठरल्या कोरोनाच्या सुपर स्प्रेडर ठरल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेले या अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
बॉलिवूड पार्ट्यामुळे अनेक सेलिब्रिटींना कोरोना झाल्याचे आपल्याला माहिती आहे. आता थोडं अलबेल सुरू असताना पुन्हा दोन अभिनेत्रींना लागण झाल्याने कपूर आणि अरोरा सूपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता बीएमसीकडून वर्तवण्यात आलीय.
आज आणखी काही बॉलिवूड सेलिब्रिटींचे कोरोना रिपोर्ट येणार आहेत. त्यावरून कळेल की, अभिनेते किंवा अभिनेत्री कोविड पॉझिटिव्ह आहेत की नाही. वरील दोन्हा अभिनेत्रींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुऴे बीएमसीची धाकधूक वाढलीय. यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन बीएमसीने केले आहे.
हेही वाचलं का?