मुंबई; पुढारी ऑनलाईन : मराठी मनोरंजन विश्वात भलेही 'फॅंड्री'फेम राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat photo) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपले हॉट फोटोज आणि व्हिडिओज शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या आणखी एका तिच्या हटके फोटोंनी सोशल मीडियावरील चाहत्यांना घायाळ केले आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या 'फँड्री' या बहुचर्चित चित्रपटातून राजेश्वरी चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. राजेश्वरी आगामी 'पुणे टू गोवा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. याच दरम्यान आता तिने बागेत उभे असलेला एक फोटो इंन्स्टाग्रावर शेअर (Rajeshwari Kharat photo) केला आहे.
या फोटोतील विशेष म्हणजे, राजेश्वरीने (Rajeshwari Kharat photo) चक्क वर्तमानापत्रापासून बनविलेला सुंदर असा ड्रेस घातला आहे. या पेपरच्या ड्रेसमध्ये ती परफेक्ट दिसत आहे. या फोटोने पुन्हा एकदा चाहते घायाळ झाले असून फोटो सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'सुप्रभात. सुंदर जग (Good morning beautiful world) ' अशी कॅप्शन लिहिली आहे.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी आपआपल्या चांगल्या- वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एकाने 'तरीच म्हटलं माझा पेपर कुठं गेला.' तर दुसऱ्या एकाने 'म्हाडाचा फुटलेला पेपर इथं आहे तर'. तर तिसऱ्या एकाने 'तरीच आज सकाळीचा पेपर का नाय आला हे समजलं?. याशिवाय चाहत्यांनी तिच्या फोटोंवर हास्याचा आणि प्रेमाचा ईमोजी शेअर केला आहे.
याआधी काल म्हाडाचा पेपर फुटल्याने राजेश्वरीने तो घातला असल्याचे चाहत्यांकडून बोलले जात आहेत. हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
याआधी ही राजेश्वरीने इंन्स्टाग्रावर काळ्या रंगाचा शार्ट टॉप आणि पांढऱ्या रंगाची पॅट परिधान केलेले फोटो शेअर केले होते. या फोटोत ती एका भितींच्या शेजारी उभे राहून पोझ देताना दिसली होती. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Saturday baby..' लिहिले होते. याशिवाय तिचा लाल रंगाच्या नऊवारी साडीतील एक व्हिडिओ शेअर समोर आला होता.
याआधीही राजेश्वरीने आपले हॉट फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने 'फँड्री', 'आयटमगिरी' या मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या 'फँड्री' या चित्रपटात तिचा एकही डॉयलॉग नाही परंतु, तिचा अभिनय चाहत्यांना खूपच आवडला आहे.
हेही वाचलंत का?