BBM3 Update : सोनाली-गायत्रीला खावी लागणार कारली | पुढारी

BBM3 Update : सोनाली-गायत्रीला खावी लागणार कारली

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या ( BBM3 Update) घरामध्ये काल साप्ताहिक कार्य सुरू झाले. घराचे रूपांतर लिलिपुट नगरात करण्यात आले आणि या नगरचे हुकूमशहा ( BBM3 Update ) घरामध्ये आलेले नवे तीन सदस्य आहेत असे बिग बॉस यांनी जाहीर केले. म्हणजेच स्नेहा, आदिश आणि तृप्तीताई.

हे हुकूमशहा सदस्यांना विविध टास्क देणार असून सदस्यांना ते पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. बघूया हुकूमशहांनी दिलेले टास्क हे सदस्य पूर्ण करू शकतील ? काय strategy असेल त्यांची या कार्यामागे ? कारण या टास्कअंती घराला मिळणार आहेत कॅप्टन पदाचे दोन उमेदवार आणि त्याबरोबर येणारी उमेदवारी अत्यंत महत्वाची असणार आहे यात शंका नाही.

कार्यामध्ये आज सोनाली आणि गायत्रीला कारली खावी लागणार आहेत. कारली खात असताना विचित्र तोंड करण्यास मनाई असून ते हात न लावता खायची आहेत. बघूया या दोघी हे कार्य कसे पार पाडतील. तृप्तीताईंनी सोनालीला कार्यामधून बाद केले आणि तिला उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.

पाहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलं का? 

Back to top button