पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका पादुकोणने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय. अस्पष्ट फोटोमध्ये दीपिकाचा चेहरा दिसत नाही. तिने काळ्या रंगाचे बॉडी-हगिंग आऊटफिट परिधान केले आहे. तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत होते. तिने 'कल्कि 2898 एडी' च्या एका कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी दीपिका हाय हिल्स घालून आली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फॅन्सनी चिंता व्यक्त करत तिला प्रेग्नेंसी काळात हिल्स न घालण्याचा सल्ला दिला.
अधिक वाचा –
काही दिवसांपूर्वी तिला जेव्हा ती मतदान करण्यासाठी गेली तेव्हा तिला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी काही नेटिजन्सन तिच्या बेबी बंपला 'नकली' म्हटलं होतं. २० मे रोजी, दीपिकाला तेव्हा पाहण्यात आलं, जेव्हा मुंबईमध्ये लोकसभा निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यात ती मतदान करायला पोहोचली.
अधिक वाचा –
१९ जूनला एका कार्यक्रमात ब्लॅक ड्रेस हाय हिल्स घालून पोहोचली. तेव्हा काही जण तिला पाहून निराश झाले. दीपिका ६ महिन्यांची प्रेग्नेंट आहे आणि इतकी उंची हिल्स घातल्याने खूप ऐकवलं. एका युजरने लिहिलं – प्रेग्नेन्सीमध्ये इतकी उंच हिल्स खूप धोकादायक आहे. एका युजरने म्हटलं की – तुम्ही कितीही सुंदर दिसत असाल, पण या काळात हाय हिल्स घालायला नको होतं. एकाने लिहिलं होतं – प्रेग्नेसीमध्ये इतकी उंची हिल कोन घालतं.
अधिक वाचा –
कल्कि 2898 एडी कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये बसलेली दीपिका पदुकोण जेव्हा मंचावर गेली तेव्हा अमिताभ बच्चन यांनी तिला आधार देऊन मंचावर आणले. यावेळी प्रभास देखील मंचावर दिसला.
video – Viral Bhayani instagramवरून साभार