जितेंद्र जोशी-उपेंद्र लिमये यांच्या ‘बंधू’ चित्रपटाचे फलटण-वाईमध्ये शूटिंग

जितेंद्र जोशी-उपेंद्र लिमये
जितेंद्र जोशी-उपेंद्र लिमये
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सान्वी प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत 'बंधू' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण फलटण आणि वाईमध्ये धडाक्यात सुरू झालं आहे. चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणाची सुरुवात करत नुकताच मुहूर्त सोहळा पार पडला. यावेळी दिग्दर्शक, निर्माते यांच्याबरोबर कलाकारही उपस्थित होते.

अधिक वाचा –

'आटपाडी नाईट्स', 'सरला एक कोटी' च्या यशानंतर लेखक – दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांच्याकडून पुन्हा एकदा वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. 'बंधू' या चित्रपटातून आपल्याला उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी या दोन कसलेल्या कलाकारांची जबरदस्त जोडी पाहायला मिळणार आहे. अॅनिमल या हिंदी चित्रपटानंतरच्या यशानंतर आता ' बंधू ' या आगळ्यावेगळ्या चित्रपटातून उपेंद्र लिमये हा एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. जिथे राम आहे.. तिथे लक्ष्मण तर येणारच असं त्याला टॅगलाईन देण्यात आलं आहे. यावरुनच ही दोन भावांमधील प्रेमाची गोष्ट आहे हे आपल्याला समजते. लवकरच भावांमधील ही अनोखी प्रेमकथा आपल्या भेटीला येणार आहे.

अधिक वाचा –

चित्रपटाबद्दल सांगताना लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी सांगितले की, मी नेहमीच सामाजिक आरोग्य सुधरवणारे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो. समाजाच्या आरोग्याचं नुकसान होईल, अशा आशयाचे चित्रपट मी हाताळत नाही. या आधी मी पती – पत्नीवर आधारित चित्रपट केले आहेत. तर आता 'बंधू' च्या निमित्ताने मी भावाभावांमधील प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आताच्या सोशल मीडिया आणि स्पर्धात्मक युगामध्ये नाती दूर होत चालली आहेत. त्यामुळे भावाभावांच्या नात्यावर भाष्य करणे मला गरजेचे वाटले. दुरावलेली नाती प्रेमाच्या ओल्याव्याने कशी जवळ येतात हे 'बंधू' या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

अधिक वाचा – 

या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे असून निर्माती आरती चव्हाण या आहेत. कार्यकारी निर्माता विनोद नाईक आहेत. तर प्रोजेक्ट हेड वैभव शिरोळकर आहेत. सिनेमॅटोग्राफर म्हणून हर्षद आत्माराम गायकवाड हे लाभले आहेत. संगीत विजय नारायण गावंडे यांचे आहे. तर गीतरचनेची धुरा गुरु ठाकूर आणि वैभव देशमुखयांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शक नितीन गणपत बोरकर हे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news