पुढारी ऑनलाईन डेस्क : बोल्ड आणि ब्युटिफूल मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने अनेक हिट चित्रपटानंतर आता एक नवी वेबसीरिज घेवून येत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' असे वेबसीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजतून पहिल्यांदाच सई आणि नागराज मंजुळे हे दोघेजण एकत्रित स्क्रिन शेअर करणार आहेत.
नुकतेच अभिनेत्री सई ताम्हणकरने आगामी 'मटका किंग' चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राईमवर चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. यावेळी सईने म्हटले आहे की, "दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्यासोबत काम करण्याची माझी खूप दिवसापासून इच्छा होती, ती आता पर्ण होत आहे. आता आम्ही दोघेजण 'मटका किंग' या वेबसीरिजमुळे पहिल्यांदा एकत्रित येत आहोत. या गोष्टीमुळे मला खूपच आनंद झाला आहे."
याशिवाय सईने अभिनेता विजय वर्मासोबत सुद्धा पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा असणार आहे. असे म्हटले आहे. यामुळे सई, विजय वर्मा यासारखे तगडे कलाकार या बेवसीरीजमध्ये असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात भारदस्त अभिनय साकारलाय. 'ग्राउंड झिरो', 'अग्नी' या उत्तम चित्रपटानंतर तिने आपला मोर्चा बेवसीरीजकडे वळविला आहे. आता सईचा 'मटका किंग' ही बेवसीरिज येत आहे.
हेही वाचा