सायली संजीव हिला वडिलांच्या आठवणीत विरह, 'बाबा, जाऊ नको दूर' - पुढारी

सायली संजीव हिला वडिलांच्या आठवणीत विरह, 'बाबा, जाऊ नको दूर'

पुढारी ऑनलाईन डेस्क

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. ही माहिती सायली संजीवने इन्स्टाग्रामवरून दिलीय. तिने वडिलांच्या आठवणीतील विरहात एक पोस्ट लिहिलीय. तिच्या वडिलांचे निधन ३० नोव्हेंबर २०२१ रोजी झाले.

सायलीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती आणि तिचे वडील एखा समुद्रकिनारी पाठमोरे उभारलेले दिसत आहेत. या फोटोसोबत तिने कॅप्शन लिहिलीय-

संजीव ❤️ २६/०७/१९५८ – ३०/११/२०२१ ❤️
तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं ❤️
दैव होता तू, देव होता तू,
खेळण्यातला माझा खेळ होता तू..
शहाणी होते मी, वेडा होता तू,
माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू..
आज तू फेडुदे पांग हे मला,
जगण्या रे मला अजूनही तूच हवा..
बाबा, थांब ना रे तू
बाबा, जाऊ नको दूर….🙏🏻🙏🏻

सायलीने दोन तासांपूर्वी ही पोस्ट लिहिलीय. मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. काही नेटकऱ्यांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केलाय. काही नेटकऱ्यांनी तिचे सांत्वन केलंय. अभिषेक देशमुख, प्रार्थना बेहरे, सुयश टिळक, सुबोध भावे, मयुरी देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Back to top button