रणवीर-दीपिका पदुकोण बेबीमूनसाठी ट्रीपवर, दीपिकाचे बेबी बंपमधील फोटो व्हायरल

रणवीर-दीपिका पदुकोण बेबीमूनसाठी ट्रीपवर, दीपिकाचे बेबी बंपमधील फोटो व्हायरल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा प्रेग्नेंसीमुळे जास्त चर्चेत आहे. दीपिका आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमाचा सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. दीपिकाने सोशल मीडिया अकाऊंटवर गरोदरपणाची बातमी शेअर केल्यापासून चाहते दीपिकाचा बेबी बंप फोटो पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र, दीपिकाने अद्याप तिच्या बेबी बंपचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. पण दीपिकाच्या काही चाहत्यांनी तिच्या इन्स्टा अकाऊंटवर तिच्या बेबी बंपचा पहिला फोटो शेअर केला आहे, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दीपिकाचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांच्या लग्नापासून त्यांचे चाहते त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. सध्या दीपिका प्रेग्नंट असल्याने तिच्याशी संबंधित प्रत्येक माहितीवर चाहते लक्ष ठेवून आहेत. दीपिकाने आपल्या प्रेग्नेंसीचा खुलासा करताना सप्टेंबर महिन्यात आपल्या बाळाला जन्म देणार असल्याचेही सांगितले होते. यामुळे रणवीर आणि दीपिकाचे चाहते त्यांच्या होणाऱ्या मुलाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जसजसे महिने उलटत आहेत, दीपिका ग्लॅमरच्या जगापासून दुरावत आहे. या वर्षी तिने जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट 'मेट गाला' देखील वगळले होते. सध्या ती तिचा बेबीमून एन्जॉय करत आहे.

दरम्यान, दीपिका आणि रणवीरचे लग्नाचे फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिसत नाहीयेत. यावरून फॅन्स वेगवेगळा कयास लावत आहेत.

रणवीरने का हटवले आपल्या लग्नाचे फोटो?

  • रणवीर सिंहच्या इन्स्टाग्रामवरून लग्नाचे फोटो गायब झाले आहेत
  • फॅन्सनी दावा केला आहे की, 'हे अभिनेत्याचे पब्लिसिटी स्टंट आहे'
  • फॅन्सनी नोटिस केलं की, रणवीर सिंहच्या अकाऊंटवरून केवळ वेडिंग नाही तर २०२३ च्या आधी सर्व पोस्ट गायब झाले आहेत
  • रणवीर सिंहच्या टीमने सूत्रांनी सांगितले की, त्याने २०२३ च्या आधीचे सर्व पोस्ट हाईड केले आहेत
  • यावेळी लग्नाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून डिलिट झाले

पहिल्यांदाच दिसला दीपिकाचा बेबी बंप

दीपिकाचा बेबी बंपसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. या फोटोमध्ये दीपिका जहाजाच्या पायऱ्या उतरत आहे. दीपिकाच्या मागे पांढऱ्या कपड्यात रणवीर सिंगही आहे. दीपिकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दीपिकाचा हा बेबी बंप फोटो पाहून चाहतेही खूप खूश आहेत आणि त्यावर सतत कमेंट करत आहेत.

प्रेग्नेंसीमुळे या इव्हेंटमध्ये दीपिकाची अनुपस्थिती

प्रेग्नेंसीमुळे दीपिका यावर्षी मेट गाला 2024 मध्ये सहभागी होऊ शकली नाही. तिने 2017 मध्ये या फॅशन इव्हेंटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती 2018 आणि 2019 मध्येही या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. दीपिकाप्रमाणेच प्रियांका चोप्रा देखील तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news