आशिकी आ गई : प्रभास-पूजा हेगडे बुडाले प्रेमात (video) - पुढारी

आशिकी आ गई : प्रभास-पूजा हेगडे बुडाले प्रेमात (video)

मुंबई; पुढारी ऑनलाईन; बाहुबली फेम अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा बहुप्रतिक्षित ‘राधे श्याम’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. याच दरम्यान ‘राधे श्याम’ या चित्रपटातील आशिकी आ गई  हे रोमॉटिक गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

नुकतेच प्रभास आणि पूजाचे युटूबवर ‘राधे श्याम’ या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचे बोल ‘आशिकी आ गई…’ असे आहे. या गाण्यात प्रभास आणि पूजाचे जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ‘आशिकी आ गई…’ या गाण्याला अरिजित सिंग यांनी स्वरबद्ध केले आहे.

‘आशिकी आ गई’ या गाण्यात प्रभास आणि पूजा हेगडे यांची प्रेमकहाणी दाखविण्यात आली आहे. या व्हिडिओत पूजा एका ट्रेनमधून उतरून प्रभासच्या दुचाकीवर बसताना आणि त्याच्यासोबत फिरताना दिसत आहे. या गाण्यात पावसासोबत निसर्गरम्य परिसर दाखवण्यात आला आहे. यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची प्रतीक्षा लागली आहे.

हे गाणे सोशल मीडियावर रिलीज होताच चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रीया दिल्या आहेत. यात खास करून चाहते अरिजित सिंगच्या आवाजाचे कौतुक करत आहेत. या गाण्याला गेल्या २४ तासांत ५० दशलक्षहून अधिक युजर्संनी पाहिले आहे. या गाण्याला संगीत मिथुन यांनी दिले आहे. ‘राधे श्याम’ येत्या १४ जानेवारी २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button