
पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील महिन्यात जामनगरमध्ये अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमध्ये जान्हवी कपूरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. (Janhvi Kapoor-Radhika Merchant ) जान्हवी कपूर दुसऱ्या सेलिब्रिटीजसोबत अनंत आणि राधिकाच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. आता जान्हवी कपूरने ब्राईड टू बी राधिका मर्चंटच्या ब्रायडल शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये पिंक थीमसह गर्ल गँग सहभागी झालेली दिसत आहेत. (Janhvi Kapoor-Radhika Merchant )
या ब्रायडल शॉवरची थीम पिंक होती. जान्हवी कपूरने आपल्या इन्स्टा स्टोरीवर ब्रायडल शॉवरचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये आठ तरुणी पिंक कलरचा ड्रेस घातलेली दिसत आहेत. मध्ये राधिका मर्चेंट बसलेली दिसते.
दुसऱ्या फोटोमध्ये सर्व मुली पिंक कलरचा सॅटिन नाईट सूट परिधान केलेली दिसत आहेत. जान्हवी कपूरने राधिका मर्चंट द्वारा शेअर केलेल्या फोटोंना आपल्या इन्स्टा स्टोरीजमध्ये रिपोस्ट केलं आहे. या फोटोंमध्ये बॉलीवूड सेलेब्समध्ये फक्त जान्हवी कपूर दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत जान्हवीने कॅप्शन दिली आहे, 'ब्लेस्ड विथ द बेस्ट.'