पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रतीक्षा संपली असून बॉलिवूडचा तरुण अँक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ आणि खिलाडी अक्षय कुमारने (Bade Miyan Chote Miyan) त्याच्या आगामी ॲक्शनर 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची रिलीज डेट शेअर केली आहे. (Bade Miyan Chote Miyan) बहुप्रतीक्षित ट्रेलर २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर १० एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Bade Miyan Chote Miyan)
टायगरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर प्रेक्षकांना ट्रेलरच्या रिलीजच्या तारखेसह तसेच चित्रपटाची माहिती दिली. "रियल ॲक्शनचा एक मोठा डोस घेण्यासाठी येत आहेत, #बडेमियांछोटेमियां! #बडेमियांछोटेमियांचा ट्रेलर २६ मार्चला! ? ?? १० एप्रिल रोजी सिनेमा प्रदर्शित होईल!"
प्रेक्षकांमध्ये #TheTigerEffect पाहण्याची अपेक्षा गगनाला भिडली आहे. कारण हा चित्रपट अभिनेत्याच्या उत्कृष्ट चित्रपटसृष्टीत आणखी एक भर पाडणार आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' व्यतिरिक्त टायगर श्रॉफ त्याच्या आगामी 'रॅम्बो', 'सिंघम अगेन' आणि नुकत्याच जाहीर झालेल्या 'बागी ४' या चित्रपटांमध्ये #TheTigerEffect दाखवण्यासाठी सज्ज आहे.