लवकरचं येणार ‘घुंगराची चाळ’, गाण्याचा टीझर पाहिला का?

घुंगराची चाळं
घुंगराची चाळं
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शंकर बाबा या गाण्याच्या यशानंतर कलावंत मराठी प्रस्तुत 'घुंगराची चाळ' गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधून कलावंताच्या जगण्याची कथा उलगडणार आहे. हे गाणं दर्शन घोष यांनी लिहीलं असून दिग्दर्शन ही त्यांनीच केलं आहे. तसेच या गाण्याचे निर्माते निलेश मुणगेकर आहेत. किरण कोरे, सुरेखा पुणेकर, निकिता भोरपकर हे कलाकार या गाण्यात आहेत.

निर्माते निलेश मनोहर मुणगेकर कलावंत मराठीविषयी सांगतात, "कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं. हाच माझा कायम हेतू आहे. आपल्या मराठी कलावंतांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन. कलावंत मराठीच्या सर्वच कलाविष्कारांवर प्रेक्षकांचं असंच प्रेम कायम असो. हीच सदिच्छा!!"

संबंधित बातम्या –

दिग्दर्शक दर्शन घोष म्हणतात, "सध्याच्या सोशल मीडियाच्या ट्रेंडिंग जगात हिंदी, इंग्रजी गाण्यांसोबतचं मराठी म्युझिक अल्बम सृष्टीत वेगवेगळे बदल होत आहेत. परंतु या स्पर्धात्मक जगात आपल्या महाराष्ट्रातील लोकसंगीत सादर करणाऱ्या कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, यासाठी कलावंत मराठीची संपूर्ण टीम कार्यरत आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news