Manushi Chhillar : मानुषी छिल्लरच्या ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’चं ‘रब है गवाह’ गाणं पाहिलं का? (video)

Manushi Chhillar
Manushi Chhillar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री मानुषी छिल्लरने ( Manushi Chhillar ) बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यापासून तिच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मानुषी तिच्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. ती आगामी 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपट घेवून येत आहे. शक्ती प्रताप सिंग हाडा दिग्दर्शित 'रब है गवाह' (हिंदी) दुसरं गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

संबंधित बातम्या

मानुषीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटातील एका स्टिलसह गाणे रिलीज करण्याची घोषणा केली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने "आता प्रेक्षक यासाठी उत्सुक आहेत." Love is in the air ❤️", "Experience the ethereal journey of love in the air ❤️". असे लिहिले आहे. या गाण्याचा व्हिडिओ युट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'मधील पहिला ट्रॅक 'वंदे मातरम' हे गाणं प्रदर्शित झाले होते. या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली. आता 'रब है गवाह' हे गाणं देखील सुपरहिट होणार का? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. ऑपरेशन व्हॅलेंटाईन चित्रपटात मानुषी छिल्लरने बॉलिवूड अभिनेता वरुण तेजसोबत पहिल्यांदा ऑन-स्क्रीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. चित्रपटात मानुषीने रडार ऑफिसरची भूमिका साकारली आहे. ऑपरेशन व्हॅलेंटाईन हा चित्रपट १ मार्च २०२४ रोजी तेलुगू आणि हिंदीमध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news