पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील दहशतवाद्यांचे काळे सत्य सांगण्यासाठी आता अदा शर्मा येत आहे. बस्तरमधील नक्षलवाद्यांच्या षड्यंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी अदाचा चित्रपट येतोय. (Bastar-The Naxal Story Teaser) सुदीप्तो सेन यांच्या चित्रपटाचे नाव बस्तर- द नक्सल स्टोरी असे असून टीजर रिलीज करण्यात आला आहे. टीजरमध्ये अदा शर्माचा परफॉर्मन्स दमदार दिसत आहे. पहिली झलक पाहा. (Bastar-The Naxal Story Teaser)
संबंधित बातम्या –
अदा शर्माने ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सोशल मीडियावर 'बस्तर- द नक्सल स्टोरी'चा टीजर शेअर केला आहे. तिने लिहिलं की, "निर्दोष लोकांच्या रक्ताने लाल रंगाची कहाणी! माहिती नसलेली कहाणी कैद करा. बस्तर- द नक्सली स्टोरीचा टीजर आऊट." चित्रपटामध्ये अदा शर्मा IPS ऑफिसर नीरजा माधवनची भूमिका साकारताना दिसणार आहे.
रिलीज झालेल्या टीजरची सुरुवात अदापासून होते. १ मिनिट १६ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अदाने म्हटलं, "पाकिस्तानसोबत झालेल्या चार युद्धांमध्ये आमचे ८ हजार ७३८ जवान शहीद झाले आहेत. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या देशात नक्षलवाद्यांनी १५ हजारहून अधिक जवानांची हत्या केली आहे. बस्तरमध्ये आमच्या ७६ जवानांना नक्षलवाद्यांनी क्रूरतेने मारलं होतं…"