पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण स्टारर चित्रपट 'फायटर'ने बॉलीवूडची सुरुवात दमदार केली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. मागील वर्षी सिद्धार्थ आनंदने शाहरुख खानचा 'पठान' देखील ठिक २५ (Fighter Box Office)जानेवारीला बॉक्स ऑफिसवर आणला होता. आता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 'फायटर' भेटीला आला आहे. (Fighter Box Office)
संबंधित बातम्या –
'फायटर'ने २२.५ कोटींच्या ओपनिंगने सुरुवात केली होती. सर्वात दमदार कमाई दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ठरली. शुक्रवारी चित्रपटाने ३९.५ कोटींचे कलेक्शन केलं. त्यानंतर शनिवारी आणि रविवार कमाईत घसरण झाली. शनिवारी २७.५ कोटी, रविवारी २८.५० कोटींचे कलेक्शन केले.
या चित्रपटाने देशभरात १०० कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. 'फायटर'ने एकूण ४ दिवसांत ११८.०० कोटींची कमाई केली आहे. जगभरात 'फायटर'ने जवळपास १८० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत १५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.