देवमाणूस २ च्या प्रमोशनासाठी रणवीर सिंह उतरला मैदानात | पुढारी

देवमाणूस २ च्या प्रमोशनासाठी रणवीर सिंह उतरला मैदानात

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ‘झी मराठी’वरील क्राईम थ्रिलर मालिका ‘देवमाणूस’ने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेचा शेवट ज्याप्रकारे केला त्यामुळे प्रेक्षक गोंधळात पडले होते. मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये देवमाणूस डॉक्टरचा खरा चेहरा काही लोकांसमोर दाखविण्यात आला नाही. एकूणच या मालिकेचा शेवट अर्धवट दाखविण्यात आला. यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली होती. आता मालिकेचा दुसरा सिझन म्हणजेच देवमाणूस २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर देवमाणूस या मालिकेच्या दुसऱ्या सिझनचा प्रोमो शेअर केला आहे. या मालिकेचा प्रोमो प्रसिद्ध झाल्यानंतर देवमाणूस २ ची चर्चा रंगली आहे. आता या मालिकेच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह देखील मैदानात उतरला आहे. रणवीरचा एक व्हि़डिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आणि या व्हि़डिओला देखिल चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

या व्हि़डिओमध्ये या मालिकेला फीट बसणारा एक डॉयलॉग रणवीर म्हणाताना दिसत आहे. रणवीर सिंह म्हणताे की, Akkha ..पब्लिक को मालूम है, कोण आनेवाला है, तेरेको नही मालूम.. सूर्यवंशी सिनेमातील रणवीरचा हा डायलॉग चांगलाच फेमस होताना दिसत आहे. देवमाणूस मालिकेत डिम्पलची भूमिका साकारणीर अभिनेत्री अस्मिताने हा व्हि़डिओ इन्स्टावर शेअर केला आहे. अस्मिताने हा व्हि़डिओ शेअर करत देवमाणूस २ सूर्यवंशी स्टाईल अशी कमेंट केली आहे. हा व्हिडीओ प्रेक्षकांना देखील खुप आवडला आहे. हा व्हि़डिओ पाहिल्यानंतर अनेकांनी मालिकेची वाट पाहत असल्याची कमेंट केली आहे.

झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर ‘देवमाणूस २’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे. या प्रोमोमध्ये संपूर्ण वाडा दाखवण्यात आला असून दवाखानाची पाटी खाली पाडण्यात आली आहे.’ असे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकत्ता शिगेला पोहचली आहे. आता प्रेक्षकांमध्ये देवमाणूस २ ची उत्सुकता वाढली आहे. तर मालिकेचा अद्याप शेवट झाला नसल्याने आणखी एक भाग येणार अशी चर्चा रंगताना दिसत आहे.

देवमाणूस या मालिकेचे ३०० एपिसोड दाखवण्यात आले. यात पैसे आणि दागिन्यांसाठी डॉक्टर एकामागून एक खून करतो. पोलिस त्याला अटक करतात. पण त्याच्यावरील गुन्हे कोर्टात सिद्ध होत नाहीत आणि तो सुटतो. ही लोकप्रिय मालिका सर्वांधिक चर्चेत होती. एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते. पण, त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. देवमाणूस मालिकेच्या पहिल्या भागात बोगस डॉक्टरचे भयानक कारनामे दाखवण्यात आले होते.

 

Back to top button