पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इतकेच नाही, तर दोघे साखरपुडा करणार असल्याची माहिती समोर आली होती. यादरम्यानच आता रश्मिका आणि विजयचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरून रश्मिका आणि विजय व्हिएतनाममध्ये व्हॅकेशन साजरा करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ( Rashmika Mandanna-Vijay )
संबंधित बातम्या
काही दिवसांपूर्वी विजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हॅकेशन ट्रिपचे फोटो शेअर केले होते. यात तो स्ट्रीट फूड खाताना दिसत होता. 'ज्यावेळी तुम्हाला हास्याचा अॅटॅक येतो' असे कॅप्शन त्याने फोटोला दिले होते. त्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या होत्या.
विजयनंतर आता रश्मिकानेही फोटो शेअर केले आहेत. यात तिने हॅट घातल्याचे दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून रश्मिका आणि विजय व्हॅकेशनला गेले असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत. रश्मिकाचे फोटो विजयने काढलेत, असे काहींचे म्हणणे आहे. फोटो शेअर करण्यात आलेल्या फोटोत रश्मिकाच्या गॉगलमध्ये दिसत आहे. ( Rashmika Mandanna-Vijay )