पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात सर्वत्र आज सोमवारी मकर संक्रांत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. कोण- कोण काल्या रंगाची कपडे परिधन करून रितीरिवाजाप्रमाणे मकर संक्रात साजरी करत आहेत. या खास सणाच्या मिनित्ताने मग मराठी आणि बॉलिवूडमधील कलाकारही कसे मागे राहतील. मराठी अभिनेत्री श्रृती मराठे मधूरा देशपांडे, सई ताम्हणकर, क्रिती शेट्टी, शिल्पा शेट्टी आणि शिवानी रांगोळे मोठ्या उत्साहात मकर संक्रात साजरी केली आहे. ( Makar Sankranti )
संबंधित बातम्या
मराठी आणि बॉलिवूड स्टार्सनी सोशल मीडियावर कोणी फोटो तर कोणी व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना मकर संक्रातीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहे. या फोटोंना कॅप्शनमध्ये तिळगुळ घ्या गोड गोड बोला, मकर संक्रातीच्या सर्वांना शुभेच्छा!!!… असे म्हटलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. ( Makar Sankranti )