Nagarjuna : नागार्जुन मालदीवचं तिकीट रद्द करुन लक्षद्वीपला…म्हणून बदलला ट्रीपचा प्लॅन
पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचा सुपरस्टार नागार्जुनचा ( Nagarjuna ) 'ना सामी रंगा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज होताच चाहत्यांनी थिअटरमध्ये तुफान गर्दी केली. परंतु, या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नागार्जुनने चित्रपट रिलीज झाल्यानंतर कुटुंबियासोबत ट्रिपला जाणार असल्याचे स्पष्ट करून मालदीव ट्रिपचा प्लॅन बनवला होता. आता त्याने एका मुलाखतीत मालदीवची ट्रिप कॅन्सल झाली असल्याचा खुलासा केला आहे. याशिवाय त्याने मालदीवला जाण्याचे विमानाचे तिकिटही रद्द केल्याची माहित समोर आली आहे. यानंतर सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांना नागार्जुन पुढचा कोणता प्लॅन बनवणार आहे?, का प्लॅन रद्द केला? याची उत्सुकता लागली आहे.
संबंधित बातम्या
साऊथ अभिनेता नागार्जुनने ( Nagarjuna का मुलाखतीत सांगितले होतं की, "ना सामी रंगा' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर कुटुंबियासोबत सुट्टीसाठी मालदीवला जाण्याचा विचार करत आहोत. १७ जानेवारीला मालदीवला रवाना होण्यासाठी तिकिटही बुकिंग झाले होते. मात्र, याच दरम्यान मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. मालदीवची भूमिका योग्य नव्हती. जवळपास १.५ अब्ज लोकांचे प्रतिनिधीत्व पंतप्रधान मोदी करत आहेत. या घटनेमुळे मला वाईट वाटले आणि त्या देशाला जाण्याचा निर्णय बदलला आणि ही ट्रिप आम्हाला कॅन्सल करावी लागली. परंतु, मी आता कुटुंबियासोबत लक्षद्वीप येथील बंगाराम बेटावर जाण्याचा विचार करत आहोत.'
तसेच लक्षद्वीप येथील बंगाराम बेटाचे त्यांनी यावेळी कौतुकही केलं आहे. तर "मी, बिग बॉस आणि 'ना सामी रंगा' चित्रपटासाठी ७५ दिवस ब्रेक न घेता काम करत होतो. यामुळेच ट्रिपला जाण्याचा निर्णय घेतला होता. आता पुढच्या आठवड्यात लक्षद्वीपला भेट देणार असल्याचे त्यांनी यावेळी संगितले आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नागार्जुनचा ९९ वा चित्रपट 'ना सामी रंगा' १४ जानेवारी २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नागार्जुनसोबत या चित्रपटात अल्लारी नरेश, आशिका रंगनाथ, मिर्ना मेनन, अल्लारी नरेश आणि राज तरुण यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत.