पुढारी ऑनलाईन डेस्क : शेमारू मराठीबाणावरील 'सौ. प्रताप मानसी सुपेकर' मालिकेत नवनविन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. प्रताप आणि मानसी यांची जोडी, त्यांच्या लग्नाच्या प्रवासासाठी सज्ज असल्यामुळे अपेक्षा नवीन उंची गाठत आहेत. सध्या सुरू असलेल्या लग्नाच्या दृश्यांमध्ये भावनांची चढाओढ दिसणार आहे. तसेच प्रखर आणि आकर्षक कामगिरी या सीन्स दरम्यान पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या
या मालिकेमध्ये प्रतापची भूमिका साकारणारे प्रदीप घुले लग्नाच्या कथानकाविषयी सांगितले आहे की, "प्रतापने सौरभला अप्रामाणिक माणूस म्हणून समोर आल्यानंतर, परिस्थितीमुळे प्रताप आणि मानसीचे लग्न मंडपात अनपेक्षितपणे पार पडले. यामुळे पाहुण्यांना धक्का बसला. दोघांनाही एकमेकांबद्दल भावना होत्या, पण ते दोघे कबूल करू शकले नव्हते. पण आता परिस्थितीने त्यांना एकत्रित आणले आहे. या ट्विस्टमुळे, प्रताप आणि मानसी यांचा वैवाहिक प्रवास गोंधळलेल्या परिस्थितीतून सुरू झाल्याने चाहत्यांना आश्चर्यकारक वाटणार आहे."
'सौ. प्रताप मानसी सुपेकर' मालिकेतील रोमांचक ट्विट्समुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लग्नाची चर्चा जसजशी तीव्र होत जाते, तसतसे प्रदीप घुलेचे पात्र, प्रताप, लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत एकिकडे रहस्ये उलगडून दाखवले असून दुसरीकडे सस्पेन्ससाठी स्टेज सेट केला आहे. यामुळे 'सौ. प्रताप मानसी सुपेकर' मधील प्रताप आणि मानसीच्या प्रवासाचा एक भाग पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.