पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रिया बापट नेहमीच परखडपणे आपले मत मांडते. ती मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच वेब सीरीजमुळे ती नेहमी चर्चेत असते. आपले अपडेट्स ती सोशल मीडियावरून देत असते. आता तिने आपला संताप व्यक्त केला आहे. (Priya Bapat) आता तिने मराठी अभिनेत्रींना संस्कृतीवरुन ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. तिने काय म्हटलंय पाहुया. प्रिया बापटने आरपारच्या 'वूमन की बात' या सेगमेंटमध्ये बोल्ड सीन्सवर प्रतिक्रिया दिल्या. (Priya Bapat)
संबंधित बातम्या –
प्रिया म्हणाली, 'मराठी अभिनेत्रींना मराठी संस्कृतीवरून नेहमीच ट्रोल केले जाते. हॉलिवूडच्या कलाकारांचे मात्र कौतुक होते. किती छान काम केलंय, किती मस्त आहे, म्हणून कौतुक करतो. तेच जर मराठी अभिनेत्रींनी केलं तर मात्र त्यांना संस्कृतीच्या नावाखाली ऐकवलं जातं. तिथे संस्कृती आड का येते?
प्रिया म्हणाली, 'मराठी मुलगी मोठ्या पडद्यावर काम करु शकते. ती उत्तम अभिनय करू शकते. याचा मात्र अभिमान नसतो. तुम्ही कशाला महत्त्व देता, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. अभिनयात काम निवडताना मी काळजीपूर्वक करते. माझ्यापासून सीन्सविषयी लपवून ठेवले जात नाही. 'सिटी ऑफ ड्रिम्स'मध्येजे सीन करावे लागणार होते, ते मला आहिती होते. मी ऑडिशन दिलं. जे मी पात्र साकारणार, ते या सर्व गोष्टींपेक्षा मोठं आहे.'
प्रिया नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अभिय करताना दिसणार आहे. 'प्रोडक्शन नंबर ८' असे चित्रपटाचे नाव असून सेजल सेठ हा दिग्दर्शन करत आहेत. ९०च्या काळातील कथा या चित्रपटातून पाहता येणार आहे.