मराठी मालिका : रविवारी आवडत्या मालिकांचे १ तासांचे विशेष भाग | पुढारी

मराठी मालिका : रविवारी आवडत्या मालिकांचे १ तासांचे विशेष भाग

पुढारी ऑनलाईन

मराठी मालिका – राया आणि कृष्णाच्या गाडीला अपघात झाल्यावर, बेशुद्ध कृष्णाला राया स्वतः श्वास देऊन वाचवतो. यावरून राया आणि कृष्णाचं भांडण होतं. रायाला त्याचं आणि कृष्णाचं नवरा बायकोयच नातं मान्य नसल्यामुळे कृष्णा माहेरी जाण्याचा निर्णय घेते. जो पर्यंत राया तिला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही तो पर्यंत ती विधात्यांच्या घरी परतणार नसल्याचं ती ठरवते. परंतु, हळदीच्या मालाची डिलीव्हरी करण्यासाठी कृष्णाच्या सहीचा प्रश्न येतो तेव्हा राया स्वतः ट्रक घेऊन कृष्णाच्या दारात येतो. तेव्हा रायाला कृष्णाचं घर जप्त केलं जाणार हे कळतं आणि जबरदस्ती घर खाली करायला लावणाऱ्या वसुलीवाल्या माणसाला राया बेदम मार देतो. राया त्याला पुन्हा कृष्णाच्या घराकडे नजर वर करूनसुद्धा बघायचं नाही म्हणतो. या तुमच्या आवडत्या मराठी मालिकांचे १ तासांचे विशेष भाग रविवारी पाहायला मिळणार आहे.

राया आणि कृष्णा मधला दुरावा दूर होईल का? राया कृष्णाला पत्नी म्हणून स्वीकारून घरी घेऊन जाईल का? हे जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका ’मन झालं बाजिंदट रविवार २१ नोव्हेंबर दुपारी १२ आणि रात्री ७ वाजता.

दिपूच्या प्रत्येक संकटात इंद्रा तिच्यामागे सावलीसारखा उभा असतो. याच कारण म्हणजे इंद्राचा दिपूवर असलेलं प्रेम पण ते त्याला व्यक्त करता येत नाही आहे. दिपू एका अपघातात आगीच्या कचाट्यात सापडते. हे पाहून इंद्रा तिच्या मदतीला धावतो. पण दिपू त्याला आगीत शिरण्यापासून थांबवते. आपल्या चारी बाजूला आग लागलेली असताना दिपूला घेरी येते. तिला वाचवण्यासाठी इंद्रा पुढे सरसावतो. तो तिला सुखरूप बाहेर काढतो. त्याचवेळी तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली पण देतो.

दिपूला इंद्राच्या भावना कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल? ही एका नवीन नात्याची सुरुवात तर नसेल? हे जाणून घेण्यासाठी पहा मन उडू उडू झालं रविवार २१ नोव्हेंबर दुपारी १ आणि रात्री ८ वाजता.

देशमुख कुटुंबीय अदिती आणि सिडच्या साखरपुड्याची तारीख ठरवण्यासाठी मुंबईला रवाना होतात. अदिती मिटींगमध्ये अडकल्यामुळे सिडचे फोन नाही उचलू शकत आणि अदिती घराच्या गेटवर पोहोचलेल्या सिड आणि त्याच्या कुटुंबाचे तिथल्या वॅाचमनशी भांडण होतं. देशमुख अडचणीतही आनंद शोधून दाखवतात आणि बराचवेळ इतकी लोकं गेटवर थांबल्यामुळे महालक्ष्मीलाच बिल्डींगमधून तक्रारीचे फोन येऊ लागतात.

शेवटी अदितीही गेटजवळ पोहोचते आणि महालक्ष्मीला नाईलाजाने देशमुखांना घरात घ्यावं लागतं. ती लगेच साखरपुड्याची तारीख जाहीर करण्यासाठी संध्याकाळी पार्टी ठेवली असल्याचं सांगते. अदिती पार्टीसाठी देशमुखांना छान तयार करते. पार्टीमध्ये आलेल्या महालक्ष्मीच्या मैत्रीणी देशमुख बायकांची खिल्ली उडवतात.

त्या परिस्थिती बिघडू नये म्हणून शांत रहातात. २१ नोव्हेंबार साखरपुड्याची तारीख ठरते. महालक्ष्मी हा साखरपुडा मोडण्यासाठी श्रीमंत मुलाला अदितीचं स्थळ सुचवते. इथे अदिती आणि सिड उत्साहात देशमुखांच्या मदतीने अंगठ्या खरेदी करतात.

सिड आणि अदितीचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडेल की महालक्ष्मी या साखरपुड्याच्या खो घालेल यासाठी पाहायला विसरू नका तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! रविवार २१ नोव्हेंबर दुपारी २ आणि रात्री ९ वाजता.

Back to top button