पुढारी ऑनलाईन डेस्क : 'नाईन-नाईन' एमी विजेता अभिनेते आंद्रे ब्रूघेर यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले. (Andre Braugher) अभिनेते आंद्रे यांना 'होमिसाईड : लाईफ ऑन द स्ट्रीट' आणि 'ब्रुकलिन ९९' यासारख्या वेब सीरीजमधील दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. (Andre Braugher)
संबंधित बातम्या –
ब्रूघेर यांचे सल्लागार जेनिफर एलनने द असोसिएटेड प्रेसला सांगितले की, एका छोट्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. या वृत्ताने अभिनेत्याचे कुटुंबीय आणि फॅन्सना धक्का बसला आहे. त्यांना सोशल मीडियावर अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
शिकागोमध्ये जन्मलेले अभिनेते आंद्रे ब्रूघेर यांनी १९८९ च्या 'ग्लोरी'मध्ये यशस्वी भूमिका साकारली होता. अनेक यशस्वी आणि लोकप्रिय भूमिका साकारल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये एका मुलाखतीत सांगितलं की, त्यांना हॉलीवूडमध्ये काम शोधण्यासाठी संघर्ष करावं लागलं. कारण, या इंडस्ट्रीमध्ये आफ्रिकी-अमेरिकन अभिनेत्यांसाठी भूमिका खूप कमी होत्या.