मन उडु उडु झालं मालिकेच्या सेटला लागली आग! | पुढारी

मन उडु उडु झालं मालिकेच्या सेटला लागली आग!

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणारी मन उडु उडु झालं या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेतील व्यक्तीरेखादेखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटत आहेत. मालिकेच्या शीर्षक गीताने तर धुरळा उडवला आहे.

अनेकांनी मोबाईलच्या रिंगटोनला हे गाणं ठेवलं आहे. मालिकेतील इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी आपल्या दिलखेच अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. रोमँटिक ड्रामा अशा अशायच्या ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेमुळे प्रेक्षकांचं हटके मनोरंजन होत असल्याच्या प्रतिक्रिया खुद्द अनेक प्रेक्षकांनी दिल्या आहेत.

मन उडु उडु झालं या मालिकेमध्ये एक अनहोनी घटना पाहयला मिळत आहे. या मालिकेतील एका ट्रेलरमध्ये अभिनेत्री एका दृश्यामध्ये ती उभी असलेल्या व्यासपीठाला शार्ट सर्कीटने आग लागलेली आहे. ही आग मोठ्या प्रमाणात भडकताना दिसत आहे.

दिपू ती आग पाहून खुप घाबरलेली आहे. यातच अभिनेता इंद्रा ही घटनास्थळी उपस्थित असतो. दिपूला आगीने वेढा दिलेला असुनही इंद्रा जीवावर उदार होतो आणि दिपुला वाचवण्यासाठी आगीत उडी मारतो. पण दिपू , ‘इंद्राजी तुम्ही प्लीज आत येवू नका’ असं म्हणून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. पण इंद्रा तीचे न एकता तिला वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावतो. दरम्यान दिपू बेशूद्ध पडते.

ती खाली कोसळणार तीतक्यात इंद्रा तीला पकडतो. तो तिला उचलून कसा बसा आगीच्या वेढ्यातून बाहेर येतो. त्यावेळी ग्लानीमध्ये दिपू इंद्राला काळजी पोटी, ‘तुम्ही कशाला आला’, असं म्हणते. त्यावर इंद्रा आवेगामध्ये, ‘तुम्हाला काही झालं असतं तर मी कसा जगलो असतो मॅडम’, असं बोलून जातो. दिपू त्यावर ‘असं का?’ असा प्रश्न विचारते. यावर, ‘कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे’ अशी झटकीपट प्रेमाची कबुली देवून जातो.

इंद्राच्या या प्रेमाचा स्वीकार दिपू करेल का? या प्रश्नाची आतूरता प्रेक्षकाना आहे. या प्रश्नाचे उत्तर २१ तारखेच्या एपीसोडमध्ये प्रेक्षकांना पाहयला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

Back to top button