गंगूबाई आणि लाल सिंग चड्ढा वेगळ्या तारखांना प्रदर्शित होणार | पुढारी

गंगूबाई आणि लाल सिंग चड्ढा वेगळ्या तारखांना प्रदर्शित होणार

पुढारी ऑनलाईन :

अखेर ज्याची शक्यता वाटत होती, ते घडून आले आहे. दिग्दर्शक राजामौली यांचा बहुप्रतीक्षित बिग बजेट चित्रपट ‘आरआरआर’ आणि संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी‘ हे एक दिवसाआड (6 आणि 7 जानेवारी) प्रदर्शित होणार होते. पण, आता गंगूबाई काठियावाडीची प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. गंगूबाई आणि लाल सिंग चड्ढा वेगळ्या तारखांना प्रदर्शित होणार आहे. गंगूबाई आणि लाल सिंग चड्ढा एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याची शक्यता होती. त्यामुळे या दोन चित्रपटांचा सामना आमने-सामने होणार होता. पण, आता दोन्ही चित्रपटांच्या वेगवेगळ्या तारखा समोर येणार आहेत.

अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या सोशल मीडियावरून ही माहिती शेअर केली आहे. आता हा चित्रपट 18 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. पण, त्यामुळे ‘गंगूबाई’ची ‘आरआरआर’शी होणारी टक्‍कर टळली असली तरी आता तिची टक्‍कर बॉक्सऑफिसवर आमीर खानच्या बहुप्रतीक्षित ‘लाल सिंग चड्ढा’सोबत होणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ व्हॅलेंटाईन दिनी 14 फेब्रुवारीला रीलिज होत आहे. दरम्यान, ‘गंगूबाई’ची रीलिज डेट पुढे ढकलल्यानंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी संजय लीला भन्साळींचे आभार मानले आहेत. ‘आरआरआर’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’या दोन्ही चित्रपटाचे निर्माते जयंतीलाल गाढा आहेत. त्यामुळेच हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात होती.

Back to top button