पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री रश्मिका मांदना आणि कटरिना कैफ डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता काजोल सोबतही असाचा प्रकार घडला आहे. काजोलचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये काजोलचा चेहरा असलेली एक महिला कॅमेऱ्यासमोर कपडे बदलताना दिसत आहे. हा व्हिडिओ डीपफेक आहे, ज्यामध्ये काजोलचा चेहरा वापरण्यात आला आहे.
हा सिंथेटिक मीडियाचा प्रकार आहे. एखादा फोटो किंवा व्हिडिओतील व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने रिप्लेस करता येतो. अशा पद्धतीने बनावट फोटो किंवा व्हिडिओ बनवणे यात फारसे काही नवीन नाही. पण Deep Fake मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून अतिशय तंतोतंत बनावट व्हिडिओ किंवा फोटो बनवला जातो. चेहऱ्यावरील अनैसर्गिक भाग, डोळे आणि डोके यांच्यात समन्वय नसणे यातून Deep Fake व्हिडिओ ओळखता येतो.
रश्मिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,"हे शेअर करत असताना मला खरोखर वाईट वाटत आहे. माझ्याबद्दलचा डीप फेक व्हिडिओ ऑनलाइन पसरवला जात आहे. त्याबद्दल मला प्रामाणिकपणे बोलायचे आहे.केवळ माझ्यासाठीच नाही, तर तंत्रज्ञानाचा कसा दुरुपयोग केला जात असल्यामुळे आज खूप हानी होण्यास असुरक्षित असलेल्या आपल्यापैकी प्रत्येकासाठी हे अत्यंत भीतीदायक आहे. आज एक महिला आणि एक अभिनेत्री म्हणून, मी माझे कुटुंब, मित्र आणि हितचिंतक यांच्याबद्दल आभारी आहे. जे माझे संरक्षण आणि समर्थन करत आहेत; पण मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना माझ्यासोबत असे काही घडले असेल, तर मी याला कसे सामोरे जाऊ शकले असते, याची मी खरोखर कल्पना करू शकत नाही.आपल्यापैकी अधिक लोकांना अशा ओळख चोरीचा परिणाम होण्याआधी एक समुदाय म्हणून आणि तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (Kajol Deepfake Video)
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा कशा प्रकारे गैरवापर होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे Deep Fake टेक्नॉलॉजी. एखाद्या व्हिडिओत दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा आणि आवाज हुबेहुबरीत्या बदलण्याचा चमत्कार हे तंत्रज्ञान करू शकते. हा बदल इतका अचूक असतो की, सर्वसामान्यांना खरा व्हिडिओ आणि खोटा व्हिडिओ यातील फरक ओळखणेही कठीण जाते. या तंत्रज्ञानची रश्मिका मंदाना बळी ठरली आहे. रश्मिकाचा चेहरा वापरून एक व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला आहे. (Kajol Deepfake Video)
हा व्हिडिओ खरा की खोटा हे ओळखता न आल्याने रश्मिकाचाच व्हिडिओ असे समजून हा व्हिडिओ एक्सवर लाखो लोकांनी पाहिला आहे. हा धक्कादायक प्रकार पुढे आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.हा मूळ व्हिडिओ झारा पटेल या महिलेचा आहे. झारा पटेल लिफ्टमधून बाहेर येतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला Deep Fake तंत्रज्ञानाचा वापर करून मॉर्फ करण्यात आले असून झाराच्या चेहऱ्यावर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे. पत्रकार अभिषेक कुमार यांनी हा प्रकार उघकीस आणला आहे. हा व्हिडिओ अनेकांना अक्षेपार्ह वाटला आहे. (Kajol Deepfake Video)
हेही वाचलंत का?