bbm -3 : मीनल-विशाल यांच्यामध्ये अबोला | पुढारी

bbm -3 : मीनल-विशाल यांच्यामध्ये अबोला

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रूसवे फुगवे हे सुरूच असतात. पण, मीनल-विशाल यांचा अबोला काही संपायचं नावचं घेत नाहीये. टास्कनंतर झालेल्या बाचाबाचीमध्ये मीनल-विशाल (मीनल शाह) कानाखाली मारेन. मला हात नाही घाण करायचे असे बरेच काही बोलून गेली. तेव्हापासून दोघांमध्ये हा अबोला सुरू झाला.

आज या दोघांमध्ये आणि विकास-सोनालीमध्ये यावरूनच चर्चा होताना दिसणार आहे. सोनाली म्हणाली, सुरुवात तरी करा बोलायला. तो म्हणाला-पाया पडू तुझ्या… सोनाली म्हणाली, ती पण करेल, तू पण काही मनामध्ये पकडू नकोस.

शाह त्यावर म्हणाली, मला काही नाही बोलायला. त्यावर विशाल म्हणाला, तू शाह आहे मी विशाल निकम आहे. तुझं मनं खूप मोठ आहे माझं नाहीये. विकासचे म्हणणे आहे. तू पण जे बोलास ते पण चुकीचे होते… निकम म्हणाला मी काय चुकीचे बोलो ? विकास आणि सोनाली निकमला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. आणि ही सगळी चर्चा सुरू असताना शाहला रडू कोसळले. बघूया हा अबोला कधी तुटणार?

पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button