Aarya 2 : शेरनी इज बॅक - सुष्मिता सेनचा आर्या लवकरच डिज्नी+ हॉटस्टारवर

आर्या परत आली आहे, आणि यावेळी फास आणखी घट्ट कसला जाणार आहे. पहिल्या सीझनच्या शानदार यशानंतर आर्याचा आणखी एक रोमांचक आणि जबरदस्त हंगाम घेऊन येत आहे. या शोचे चाहते बहुप्रतिक्षित सिक्वेलच्या टीझरसाठी खूप उत्सुक होते. याचा टीझर एक प्रभावी आणि वेधक कथानक सादर करते ज्यात आर्या तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेते. सुष्मिता सेनचा आर्या (Aarya 2) लवकरच डिज्नी+ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. (Aarya 2)
राम माधवानी निर्मित हा वेब शो आहे. आर्याच्या दुसऱ्या सीजनमध्ये आर्या सरीनचा प्रवास अधिक कठोर आणि गडद होणार आहे. या टीजरमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन एक भयंकर आणि क्रूर लूकमध्ये दिसत आहे. ती उग्र लाल रंगात माखलेली आहे. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कठोरपणे लढणाऱ्या वाघीणीसारखी दिसत आहे.
दुसऱ्या सीजनविषयी दिग्दर्शक राम माधवानी म्हणाले की, ‘‘पहिल्या सीजनसाठी आम्हाला मिळालेले प्रचंड कौतुक आणि प्रेम खूप सुखवणारे होते. यासाठी आम्ही प्रेमपूर्वक आणि संपूर्ण मेहनतीने याचा दुसरा सीजन बनवण्याचा निर्णय घेतला. इंटरनॅशनल एमी अवार्ड्समध्ये बेस्ट ड्रामा श्रेणीमध्ये झालेले या शोचे नॉमिनेशन या कथेवरचा आमचा विश्वास प्रदर्शित करतो. जी ऐकवण्यासाठी आम्ही इथे आहोत.
शोच्या चाहत्यांना आर्याच्या प्रवासातील पुढचे पाऊल सादर करण्यासाठी मी उत्साहित आहे. ती प्रत्येक पाऊलावर आव्हानांना सामोरे जाते. कारण ती आपल्या परिवाराला जिवंत ठेवणे आणि बदला घेण्यासाठी संतुलन बनवण्यासाठी मजबूर आहे.
हेही वाचलं का?
- Jacqueline Fernandez कडून बिकीनीत पुन्हा एकदा पाणी पाणी (photos)
- Sai Kalyankar : ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री लवकरचं अडकणार विवाहबंधनात
- Chandigarh Kare Aashiqui : वाणी-आयुष्मान यांचा किसींग सीन व्हायरल
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram