Big Boss 17
Big Boss 17

Big Boss 17 : विकीसोबतचा लिपलॉक पाहताच कंगनाचा अंकिताला सल्ला (video)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस १७' ( Big Boss 17 ) या शोचा पहिला वीकेंड वॉर खूपच चर्चेत आला. या शोत वेगवेगळ्या टास्कमधून सर्वच स्पर्धकांचा कस लागताना पाहायला मिळतोय. या धमाकेदार शोमध्ये गेल्या कही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैनसोबत प्रवेश केला. यानंतर हे कपल रोमँटिक गाण्यावर मनमुराद थिकताना दिसले. आता या शोत बॉलिवूडची क्विन अभिनेत्री रंगना राणावत यांनी आवर्जून उपस्थिती लावली. याच दरम्यान कपल डान्समध्ये अंकिता आणि विकीचा रोमँटिक अंदाजात खुलेआम लिपलॉक करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या 

सलमानच्या बिग बॉस १७ (Big Boss 17) च्या पहिल्या वीकेंड वारमधून या आठवड्यात मन्नारा चोप्रा, अभिषेक आणि नावेद यांना घराबाहेर काढण्यासाठी नामांकन देण्यात आले होतं. परंतु, सलमानने सणासुदीचा हंगाम सुरू असल्यामुळे कोणतेही एलिमिनेशन होणार नाही असे जाहीर केलं. ही घोषणा ऐकून सर्वच स्पर्धकांना आनंद झाला. दरम्यान या शोत अभिनेत्री कंगना राणावत तिच्या आगामी 'तेजस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली. दरम्यानच कपलच्या डान्ससाठी अंकिता लोखंडे- विकी जैन आणि ऐश्वर्या शर्मा- नील भट्ट यांना निमंत्रित करण्यात आले. याशिवाय नवरात्रीचा उत्सव असल्याने बिग बॉस १७ घरात दाडिया खेळण्यात आला.

अंकिता आणि विकीने 'हंगामा हो गया' या गाण्यावर रोमँटिक अंदाजात धमाकेदार परफार्म केला. दरम्यान शेवटी अंकिताने विकीला लिपलॉक केलं. यावर कंगनाने तिला सल्ला देत म्हटलं की, 'अंकिता याच्या पुढं काही करू नकोस….'. यावेळी अंकिता ग्रीन कलरच्या अनारकलीमध्ये ग्लॅमरस आणि विकी ब्लॅक सूटमध्ये हॅडसम दिसला. तर कंगना पिंक कलरच्या शॉर्ट ड़्रेसमध्ये दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्सनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news